Karnataka BJP MLA Munirathna Naidu: कर्नाटकमधील भाजपाचे आमदार एन. मुनिरत्न नायडू यांनी वारंवार बलात्कार करून हनीट्रॅप करण्यासाठी बळजबरी केल्याचा आरोप एका महिलेने केला असल्याची बातमी पीटीआयने दिली आहे. या महिलेने तक्रार दाखल केली असून त्यात दावा केला की, आमदारांनी विविध ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कर्नाटक विधानसभेची इमारत आणि सरकारी वाहनात अनेकवेळा बलात्कार झाला असल्याचा दावा पीडित महिलेने केला. तसेच ही घटना उघड केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही आमदारांनी दिली होती, असेही पीडित महिलेने सांगितले आहे.

पीडितेने दावा केला की, मुनिरत्न यांनी २०२० ते २०२३ या काळात तसेच ते मंत्री असताना ऑगस्ट २०२१ ते मे २०२३ या काळातही वारंवार बलात्कार केला. यानंतर मागच्या शनिवारी (१४ सप्टेंबर) विशेष न्यायालयाने मुनिरत्न नायडू यांना बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि गुन्हेगारी कारवाई या गुन्ह्यासाठी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर पोलिसांनी त्यांची रवानगी परप्पाना अग्रहारा येथील मध्यवर्ती कारागृहात केली.

Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
Neelam Kothari
“ती खूप घाबरली…”, समीर सोनीने सांगितला पत्नी नीलम कोठारीचा किस्सा; म्हणाला, “तुम्ही विशीत असताना…”
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
High Court allows 11 year old girl who became pregnant due to sexual abuse, to have abortion at 30 weeks Mumbai news
लैंगिक अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या ११ वर्षांच्या मुलीला दिलासा; ३० व्या आठवड्यांत गर्भपात करण्याची उच्च न्यायालयाकडून परवानगी
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!
Jayant Patil On Ajit Pawar
Jayant Patil : ‘सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना १० वर्षे ब्लॅकमेल केलं’; त्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा का होती? जयंत पाटलांचा मोठा दावा

काग्गलीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोडणाऱ्या एका खासगी रिसॉर्टमध्ये बलात्काराची घटना घडल्यानंतर ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आमदारांसह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे वाचा >> BJP MLA Munirathna Naidu : कंत्राटदाराचा छळ केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदाराला अटक; कोण आहेत मुनीरत्न नायडू?

आमदार मुनिरत्न यांनी आरोप फेटाळले

दरम्यान आमदार मुनिरत्न यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत. सदर आरोप झाल्यानंतर काँग्रेसतर्फे विधानसभा इमारतीचे शुद्धिकरण करण्यात येणार होते. पण पोलिसांनी काँग्रेस नेते मनोहर यांना ताब्यात घेऊन हे आंदोलन होऊ दिले नाही, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

हनीट्रॅपसाठी दबाव टाकला

पीडित महिलेने असाही दावा केला आहे की, आमदारांनी त्यांना विविध खासगी रिसॉर्टमध्ये हनीट्रॅप करण्यासाठी बळजबरी केली. जर मी हे काम केले नाही, तर मला ठार केले जाईल, अशी धमकी त्यांनी दिली होती. या कामात आमदारांचे बॉडीगार्ड आणि त्यांचे सहकारीही गुंतले असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

हे ही वाचा >> Karnataka : निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे मंत्री अडचणीत; द्वेषपूर्ण भाषण आणि साडीवाटप प्रकरणात अटकेची शक्यता!

कोण आहेत आमदार मुनिरत्न?

मुनिरत्ना नायडू हे कर्नाटकमधील राजराजेश्वरी नगरमधील भारतीय जतना पक्षाचे आमदार आहेत. मुनिरत्न यांची पार्श्वभूमी वादाची राहिली आहे. दरम्यान, मार्च २०२३ मध्ये पोलिसांनी मुनिरत्ना नायडू यांच्यावर ख्रिश्चनांच्या विरोधात द्वेषयुक्त भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

मुनिरत्न नायडू यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात उत्तर बंगळुरूमधील यशवंतपूर येथून नगरसेवक म्हणून केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर राजराजेश्वरीनगर मतदारसंघात त्यांचे वर्चस्व राहिले. मुनिरत्ना नायडू हे दोनदा २०१३ आणि २०१८ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर एका वर्षानंतर भाजपाचे उमेदवार म्हणून पोटनिवडणूक जिंकली होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी ऑगस्टमध्ये त्यांना फलोत्पादन मंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.