इस्रायल लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख अहरॉन हलिवा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. त्यानंतर इतर हल्लेही झाले. ज्यांची माहिती मिळवू शकलो नाही त्यामुळे मी पद सोडतो आहे असं हलिवा यांनी स्पष्ट केलं आहे. हमासचा हल्ला आणि इतर कारवाया रोखण्यात अपयश आल्याने आणि त्याची माहिती न मिळाल्याने मेजर जनरल अहरॉन हलिवा यांनी पद सोडलं आहे. इस्रायलवर हल्ले झाल्यानंतर त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन पद सोडणारे अहरॉन हलिवा हे पहिलेच अधिकारी ठरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२०० लोक आत्तापर्यंत ठार

इस्रायल लष्करातले बडे अधिकारी असलेल्या हलिवा यांच्या राजीनाम्यामुळे आता पुढे लष्करात काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सीमांवर स्फोट घडवले. क्षेपणास्त्र डागली. कशाचीही पर्वा न करता हल्ले करण्यात आले. ज्यामध्ये आत्तापर्यंत १२०० लोक ठार झाले आहेत. या १२०० पैकी अनेक सामान्य निरपराध नागरिक होते. गाझामध्ये २५० लोकांना ओलीस ठेवण्यात आलं आहे.

लष्कराने काय म्हटलं आहे?

इस्रायलच्या लष्कराने हलिवा यांच्या राजीनाम्यानंतर एक पत्रक काढलं आहे. ज्यामध्ये लष्कराने असं म्हटलं आहे की अहरॉन हलिवा यांनी हमास हल्ल्यांचा दोष आपल्या खांद्यावर घेतला. युद्ध सुरु झाल्यानंतर हलिवा यांनी जाहीरपणे सांगितले की आपण गुप्तचर विभागाचे प्रमुख असूनही हल्ल्यांचा डाव हाणून पाडण्यात आणि हमासला रोखण्यात अपयशी ठरलो. गुप्तचर विभागाचे इशारे देण्यात कमी पडलो. त्यामुळे त्या गोष्टींची जबाबदारी घेऊन मी राजीनामा देत आहे. लष्कराने हलिवा यांचा राजीनामा स्वीकारल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

हे ही वाचा- विश्लेषण : इराण-इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार? परिस्थिती चिघळण्यास अमेरिकेची चूक कशी कारण ठरली?

ऑक्टोबर महिन्यात काय म्हणाले होते हलिवा?

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात जेव्हा हमासकडून हल्ले सुरु झाले तेव्हाही अहरॉन हलिवांनी हे जाहीरपणे सांगितलं होतं की हमासने आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. त्यांना काय करायचं होतं याचा आम्हाला गुप्तचर म्हणून थांगपत्ताही लागला नाही. गुप्तचर विभाग म्हणू जे अपयश आलं त्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे असंही अहरॉन हलिवा म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Head of israeli military intelligence resigns over october 7 failures first senior figure to step down over hamas attack scj
Show comments