अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास (८५) यांना ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. ते सध्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री सत्येंद्रदास यांना स्ट्रोकचा झटका आला आहे. त्यांना मधूमेह असून हायपरटेन्सिव्ह आहे. ते एसजीपीजीआय रुग्णालयात रविवारी दाखल झाले असून ते सध्या न्युरॉलॉजी वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत, असं रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे. “त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत आणि सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहे”, असं रुग्णालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली तेव्हा दास तात्पुरत्या राम मंदिराचे पुजारी होते.

बातमी अपडेट होत आहे