मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासाठी नेपथ्य तयार करणारा पाकिस्तानी अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली याला आज, गुरुवारी अमेरिकी न्यायालयात शिक्षा सुनावली जाणार आहे. त्याला किमान ३० ते ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होईल असा अंदाज आहे. हेडलीचा साथीदार तहव्वूर राणा याला नुकतीच १४ वर्षांची शिक्षा झाली आहे.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी हेडली दोन महिने मुंबईत वास्तव्यास होता. त्याने या वास्तव्यादरम्यान ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, छबाड हाऊस, शिवसेना भवन आदी महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली.
 या सर्व ठिकाणांची छायाचित्रे त्याने लष्कर-ए-तोयबाला पुरवली तसेच येथील बारीकसारीक माहितीही त्याने पाकिस्तानातील त्याच्या वरिष्ठांना कळवली. त्यानंतरच मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर हेडलीने डेन्मार्कमधील वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा कट रचला होता. त्यासाठी जात असतानाच अमेरिकेच्या एफबीआयने त्याला अटक केली. तेव्हापासून त्याच्यावर येथील न्यायालयात खटला सुरू आहे. हेडलीची चौकशी पूर्ण झाली असून गुरुवारी त्याच्यावरील खटल्याची सुनावणी होणार आहे. हेडलीचा गुन्ह पाहता त्याला किमान ३० ते ३५ वर्षे शिक्षा होऊ शकेल. मात्र, त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावी असे भारत सरकारचे मत आहे.

Story img Loader