देशातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता केंद्राने सात राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे. या राज्यांमध्ये आठवड्याचा करोना संसर्गाचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग देण्यासोबतच कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सुचना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.

“…तर हिंदुंनाही तिसरा डोळा उघडावा लागेल” शिवलिंगाचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी नितेश राणेंचा इशारा

येत्या काळात अनेक सण, उत्सव भारतात साजरे केले जातील. यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोनाच्या संसर्गासह त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

दिल्ली दौरा कशासाठी? राजधानीत दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी…”

दरम्यान, दरम्यान, भारतात गेल्या २४ तासात १९ हजार ४०६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील पाच, छत्तीसगढमधील ३, दिल्ली, जम्मू-काश्मीर, राजस्थान, गुजरात, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येकी दोन, तर हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, नागालँड, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, ५७१ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत.

सध्या देशात एकुण संक्रमणापैकी ०.३१ टक्के सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.५० टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. एकीकडे जगात मंकीपॉक्सचा धोका वाढत असताना देशातही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. संक्रमित रोगांचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे आहे. करोनापासून बचावासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अत्यंत आवश्यक आहे.

Story img Loader