पीटीआय, नवी दिल्ली : अमेरिकास्थित ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या कंपन्यांविरुद्ध काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांच्या याचिकेवर १७ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने जया ठाकूर यांच्या वकिलांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याच्या मागणीची दखल घेतली.  प्रारंभी खंडपीठाने २४ फेब्रुवारी रोजी सुनावणीस सूचिबद्ध करण्यास तयारी दर्शवली. मात्र, ठाकूर यांच्या वकिलाने १७ फेब्रुवारी रोजी या संदर्भात दोन अन्य जनहित याचिका सूचिबद्ध आहेत, याकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका १७ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी सूचिबद्ध केली.