नवी दिल्ली : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर सोमवारी सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्या. सूर्य कांत, न्या. दीपंकर दत्त आणि न्या. के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. अजित पवार गट पक्षादेश जारी करण्याची शक्यता असल्याने तातडीने सुनावणी घेण्याची विनंती शुक्रवारी करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ती मान्य केली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घडय़ाळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल करण्याचा निर्णय दिला होता. तर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hearing on sharad pawar petition today amy
Show comments