सध्या सोशल मिडीयावर हत्तीच्या एका लहान पिल्लाचा हदय विदीर्ण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथील घटनेचा आहे. येथील जंगलात एका हत्तीणीचा मृत्यू झाल्याने ती मरून पडली होती. यावेळी तिचे लहान पिल्लूही तिच्यासोबत होते. हत्तीणीचा मृत्यू झाल्यानंतर या पिल्लाला काहीच कळेनासे झाले होते. त्यामुळे हे पिल्लू वारंवार आपल्या आईच्या मृतदेहाजवळ जाऊन तिला उठविण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओत दिसत आहे. वनखात्यातील कर्मचाऱ्यांना हत्तीणीचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर ते याठिकाणी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले होते. मात्र, हे पिल्लू कोणालाही त्याच्या आईच्या मृतदेहाजवळ येऊन देत नव्हते. हत्तीणीच्या शरीराला वारंवार धक्के मारून पिल्लू तिला उठविण्याचा प्रयत्न करत होते. अनेक प्रयत्न करूनही हत्तीण प्रतिसाद देत नसल्यामुळे हे पिल्लू अक्षरश: हतबल झाले होते. हे एकुणच दृश्य हदय विदीर्ण करणारे होते. दरम्यान, वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी पिल्लाला बाजूला आणण्यासाठी त्याला चाऱ्याचे आमिषही दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे पिल्लू काही केल्या ऐकण्यास तयार नव्हते. वनखात्याच्या माहितीनुसार, शरीरातील अंतर्गत रक्तस्त्रावामुळे या हत्तीणीचा मृत्यू झाला असावा.
WATCH-Coimbatore (TN) Heart-rending visuals of elephant calf trying to wake his mother who died of internal bleedinghttps://t.co/f4qF1sGKDw
— ANI (@ANI_news) July 6, 2016