video of long queues outside crematoriums in China spreads Covid fear: चीनमध्ये करोना संसर्गाचा विस्फोट झाला आहे. वाढत्या करोना संसर्गामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडताना दिसत आहे. अनेक शहरांमध्ये रुग्णालयामधील बेड्स पूर्णपणे भरले असून रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढतच आहे. अशातच आता चीनमधील करोना संसर्गाची दाहकता दर्शवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अनेकजण आपल्या नातेवाईकाचा मृतदेह घेऊन दफनभूमीबाहेर रांगेत उभे असल्याचं दिसत आहे.

आरोग्यविषय तज्ज्ञ एरिक फिजल-डिंग यांनी ट्विटरवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या प्रियजनांचे मृतदेह घेऊन दफनभूमीच्याबाहेर अनेक तास आपल्या क्रमांक येण्याची वाट पाहत असलेले नागरिक या व्हिडीओमध्ये दिसत असल्याचा दावा डॉ. डिंग यांनी केला आहे.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

हेही वाचा – करोनाच्या नव्या लाटेमुळे चीनसमोर आर्थिक संकट! पगार न मिळाल्याने अनेक शहरांमध्ये नागरिकांची आंदोलनं; पाहा Video

“दफनभूमीबाहेरील लांब रांगा. तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक तास रांगेत उभं राहुून वाट पाहण्याबरोबरच त्या मृत व्यक्तीच्या मृतदेहाबरोबर रांगेत उभं राहणं हा विचारही भयानक वाटतो,” असं डॉ. डिंग यांनी कॅप्शनमध्य म्हटलं आहे. चीनमध्ये सध्या थैमान घालणाऱ्या करोना लाटेच्या चकाट्यात सापडलेल्यांबद्दल थोडी सहानुभूती दाखवूयात, असंही डॉ,. डिंग म्हणालेत.

आणखी वाचा – चीनमधील करोना उद्रेक कशामुळे? कोविड पॅनेलचे प्रमुख अरोरा यांनी सांगितलं, म्हणाले “तेथे चार…”

एक डिसेंबरपासून चीनमध्ये करोनाची नवीन लाट आली असून अनेक मृत्यू जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या देशात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र सरकारी आकडेवारी वेगळेच आकडे सांगत असल्याने माहिती लपवली जात असल्याची शंकाही घेतली जात आहे.

Story img Loader