अल-कायदाने हल्ल्याची योजना आखली असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्याने लंडनच्या हिथ्रो विमानतळावर अत्यंत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. महिला आत्मघातकी हल्लेखोर ‘ब्रेस्ट इम्प्लाण्ट’च्या साहाय्याने स्फोटके दडवून स्फोट घडविण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
लंडनबाहेर जाणाऱ्या विमानांवर हल्ले करण्याची योजना अल-कायदाने आखली असल्याचे संकेत गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याबाबत भीतीचे वातावरण आहे. महिला आपल्या स्तनांमध्ये स्फोटके दडवून आणण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यंत सावधानतेचा इशारा देण्यात आल्याने प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे; परिणामी विमानतळावर लांबच लांब रांगा दिसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Story img Loader