जेरुसलेम : इस्रायली हवाई दलाने गाझा पट्टीमधील ‘हमास’च्या तळांना लक्ष्य करत तुफान बॉम्बवर्षांव केला. या तीव्र हल्ल्यात शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या असून सामान्य नागरिकांना संयुक्त राष्ट्रांच्या छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. दुसरीकडे इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकांची जमवाजमव सुरू केली असल्यामुळे कोणत्याही क्षणी जमिनीवरील लढाईला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गाझा पट्टीवर नियंत्रण असलेल्या ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने शनिवारी पहाटे गाफील इस्रायलवर हल्ला करून जगाला धक्का दिला. त्यानंतर रविवारी इस्रायलने युद्धाची अधिकृत घोषणा केल्यानंतर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांची तीव्रता मंगळवारी वाढविण्यात आली. मध्यरात्रीपासून गाझाचा मध्यवर्ती भाग असलेल्या व ‘हमास’चे मुख्यालय तसेच बहुतांश मंत्र्यांची निवासस्थाने-कार्यालये असलेल्या रिमल भागाला इस्रायली विमानांनी लक्ष्य केले.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Syria loksatta news
अग्रलेख : वाळवंटातले वालीहीन!
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा >>> “इस्रायलने आता तरी कब्जा सोडावा, आणखी एका युद्धाने..”, पॅलेस्टाईनच्या मुस्तफा बरगोतींचं परखड भाष्य

गाझा पट्टीतील एकामागोमाग एक वस्त्यांवर बॉम्बहल्ले झाल्यामुळे सामान्य नागरिकांना जीवाच्या आकांताने पळावे लागत आहे. इस्रायलने कोणतीही पूर्वसूचना न देता सामान्य नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप ‘हमास’च्या सशस्त्र दलाचा प्रवक्ता अबू ओबैदा याने केला आहे. सामान्य नागरिकांवरील हल्ले थांबले नाहीत तर ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांना ठार मारण्याची धमकीही हमासने दिली आहे. या धमकीला प्रत्युत्तर देताना इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी कोणत्याही युद्धगुन्ह्याला माफ केले जाणार नाही, असा इशारा दिला.

दरम्यान, युद्धाची घोषणा केल्यानंतर इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकांना तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलच्या सीमावर्ती भागांमधील डझनावारी शहरे मोकळी करण्यात आली असून तेथील नागरिकांना देशाच्या आतील भागांमध्ये सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यामुळे इस्रायल कोणत्याही क्षणी गाझा पट्टीवर जमिनीवरून हल्ले सुरू करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे गाझा पट्टीमध्ये अत्यंत दाटीवाटीने गरिबीच्या स्थितीत राहणाऱ्या सुमारे २३ लाख नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> थरारक! कारमधून पळून जाणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांवर इस्रायली पोलिसांनी भररस्त्यात झाडल्या गोळ्या, व्हिडीओ व्हायरल

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

चार दिवसांच्या युद्धात बळी पडलेल्यांचा आकडा १,७००च्या घरात पोहोचला आहे. आतापर्यंतच्या संघर्षांत आपले किमान १ हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याचे इस्रायलने जाहीर केले असून प्रतिहल्ल्यांमध्ये गाझा आणि वेस्ट बँक परिसरातील ७०४ नागरिकांचा बळी गेल्याचा दावा तेथील यंत्रणांनी केला आहे. यात बहुतांश अतिरेकी असल्याचे इस्रायलचे म्हणणे असले, तरी याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. आपल्या देशात हमासच्या किमान १,५०० अतिरेक्यांचे मृतदेह असल्याचा दावाही इस्रायलने केला आहे.

इस्रायलच्या शहरावर हल्ला

इस्रायलच्या किनारपट्टी भागातील अश्केलोन शहरावर ‘हमास’ने मंगळवारी क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये ५४ वर्षांची एक महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ‘टाइम्स ऑफ इस्रायल’ने म्हटले आहे. हा हल्ला करण्यापूर्वी काही तास आधी हमासच्या प्रवक्त्याने शहर रिकामे करण्याचा इशारा देऊ केला होता.

नेतान्याहू यांची मोदी यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून इस्रायलमधील परिस्थिती आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईची माहिती दिली. यावेळी शनिवारच्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र आणि नि:संदिग्धपणे निषेध करत असल्याचे मोदी यांनी नेतान्याहू यांना सांगितले. या संभाषणाबद्दल मोदी यांनी ‘एक्स’वर माहिती देताना कठीण काळात भारतीय नागरिक ठामपणे इस्रायलच्या पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट केले.

Story img Loader