मणिपूरमधील थौबल जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी गस्तीवर असणाऱ्या अर्ध सैनिक दलाच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली. सुमारे तासभर चाललेल्या या धुमश्चक्रीत कोणी जखमी झाल्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नसल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
थौबल जिल्ह्य़ातील यैरीपोक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंगबाल गावाजवळ सुरक्षारक्षक पोहोचले असता घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा जवानांनीही नक्षलवाद्यांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला.दरम्यान, या चकमकीत नक्षलवाद्यांकडील कोणी जखमी वा मृत झाल्याबाबतची माहिती उपलब्ध झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मणिपूरमध्ये सुरक्षारक्षक व नक्षलवाद्यांमध्ये चकमक
मणिपूरमधील थौबल जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी गस्तीवर असणाऱ्या अर्ध सैनिक दलाच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली. सुमारे तासभर चाललेल्या या धुमश्चक्रीत कोणी जखमी झाल्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नसल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
First published on: 21-06-2013 at 12:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy exchange of fire between forces militants in manipur