बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने बंरुळुरुला शहराला चांगलेच झोडपून काढले. संध्याकाळी ७ च्या सुमारास सुरू झालेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. दोन ते अडीच तास चाललेल्या या पावसामुळे शहरातील आयटी झोनसह पूर्व, मध्य आणि दक्षिण भागातही पाणी साचले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील राजामहल गुट्टाहल्ली भागात ५९ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच पुढचे तीन दिवस बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शाळेतून घराकडे निघालेल्या तीन मुलांवर वाटेतच काळाची झडप; मातीच्या ढिगाऱ्याखील दबून मृत्यू

दरम्यान, या पावसामुळे शहारातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. संध्याकाळच्या सुमारास पावसाने जोर धरल्याने ऑफिसमधून घरी जाणाऱ्यांना मेट्रो स्टेशनवरच आसरा घ्यावा लागला. तसेच या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी भिंती आणि झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

यंदा बंगळुरूमध्ये पावसाने सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत बंगळुरूमध्ये १७०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये सर्वाधिक १६९६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.

हेही वाचा – गाझियाबादमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार ; पीडितेची प्रकृती स्थिर; चार जणांना अटक

गेल्या महिन्यातही बंगळुरूमध्ये तीन दिवस सतत पाऊस पडल्याने पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. यावेळीही आयटीपार्कसह शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. तसेच विजेच्या तारा तुटण्याच्याही घटना घडल्या होत्या. अनेक शाळाही बंद करण्यात आल्या होत्या.