Heavy Rainfall In Delhi: दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. यामुळे दिल्लीकरांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. नोएडातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तर गुडगावमधील खाजगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळला आहे. यामुळे काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. दमदार पावसामुळे एनसीआरमधील काही मालमत्तांचे नुकसान झाले आहे. रस्ते जलमय झाल्यामुळे वाहतूक पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. काही भागात झाडे उन्मळून पडल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.

मान्सुन माघारी परतत असताना झालेल्या पावसामुळे दिल्ली-एनसीआरमधील ४६ टक्क्यांची पाण्याची तूट भरुन निघाली आहे. यामुळे दिल्लीकरांना स्वच्छ हवा अनुभवायला मिळत असून तापमान नियंत्रित राहण्यास मदत होत आहे. नवी दिल्लीत आज किमान तापमान २३.८ डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान २८ डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

Story img Loader