उत्तराखंडमधील विविध भागांना विशेषत: कुमाव परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचप्रमाणे अनेक नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.
कुमाव परिसरातील उधमसिंगनगर आणि चंपावत जिल्ह्य़ांमध्ये पावसाची संततधार सुरू असून पिठोरगड जिल्ह्य़ातील मुनसारी गावात दरडी कोसळल्याने सहा घरांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे.
गंगा, यमुना, कोसी आणि शारदा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून आमचे त्यावर लक्ष आहे आणि कोणत्याही घटनेला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, विविध केंद्रीय मंत्रालयांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे पथक सहसचिव (गृह) लोकेश झा यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंडच्या दौऱ्यावर आले असून ते २० जुलैपर्यंत उत्तराखंडमधील नुकसानीचा आढावा घेणार आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने उत्तराखंडतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गुरुवारी सात कोटी रुपयांची देणगी देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा