पीटीआय, शिमला : हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर अडकलेल्या ५० पेक्षा अधिक नागरिकांची राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी सुखरूप सुटका केली. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. शेहनु गोऊनी गावात गुरुवारी ढगफुटीची घटना घडली. या परिसरात भूस्खलनाच्या घटना घडल्यानंतर रस्ते बंद झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अधिकाऱ्यांनी सांगितले की, एनडीआरएफचे जवान १५ किलोमीटरचा पायी प्रवास करून घटनास्थळी पोहोचले. त्यांनी १५ मुलांसह अनेकांना सुरक्षित स्थळी पोहोचविले. अन्य एका घटनेत शुक्रवारी बलाद नदीच्या तीव्र प्रवाहामुळे औद्योगिक क्षेत्र बद्दी आणि पिंजोर यांना जोडणारा बद्दी येथील मारनवाला पूल कोसळला. या घटनेत जीवितहानी झाली नाही. मुसळधार पावसामुळे राज्यातील ७०९ रस्ते बंद आहेत.