पीटीआय, अमरावती

तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यांत गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून त्याचा फटका ४.५ लाख नागरिकांना बसला आहे. राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने मदतकार्यास सुरुवात केली असून ३१,२३८ जणांना १६६ मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. पावसामुळे दोन्ही राज्यांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Ladki Bahin Yojana Pune, Pune District women Ladki Bahin, Ladki Bahin Yojana benefit,
Ladki Bahin Yojana Pune : पुणे जिल्ह्यात ५० हजार ‘बहिणी’ ‘लाडक्या’ होण्याच्या प्रतीक्षेत!
29 villages Vasai Virar, Vasai Virar Municipal Corporation, Vasai Virar,
२९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
Magnav taluka , Four people drowned, Kundalika river,
रायगड : कुंडलिका नदीत बुडालेल्या चौघांचा मृत्यू
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

विजयवाडा, गुंटूर, कृष्णा, एलुरु, पायनाडू, बापटला आणि प्रकाशम या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या २० आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या १९ तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत. गुंटूर आणि एनटीआर जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार भारतीय नौदलाने आपत्तीग्रस्त भागात शोध आणि बचावकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्याचे मान्य केले; त्यापैकी एक आधीच विजयवाडा येथे आले आहे, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले. पुराचा सर्वाधिक फटका विजयवाडा जिल्ह्याला बसला असून तिथे दुधासह जीवनावश्यक वस्तूंसाठी रहिवाशांना संघर्ष करावा लागत आहे.

हेही वाचा >>>Karsen Kitchen : अंतराळात जाणारी सर्वांत तरुण महिला; २१ व्या वर्षी इतिहास रचणारी कार्सेन किचन कोण?

तेलंगण सरकारची केंद्राकडे मदतीची मागणी

तेलंगणमध्ये पावसामुळे सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले. या राज्यांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने तातडीने दोन हजार कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारने केली. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूरग्रस्त भागाचा दौरा करून पूर ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले.

दक्षिण मध्य रेल्वेला फटका

सिकंदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेला पावसाचा मोठा फटका बसला. रुळांवर पाणी साचल्याने तब्बल ४३२ गाड्या रद्द करण्यात आल्या आणि १३ गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या. सोमवारी दुपारपर्यंत १३९ गाड्या वळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काझीपेठ-विजयवाडा विभागात पूर आणि दरड कोसळल्या आणि पाच गाड्या अडकून पडल्या.

Story img Loader