भारतीय नौदलाच्या चेतक या हेलिकॉप्टरच्या दुर्दैवी अपघातात तीन नौदल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये दोघा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुंबई येथून बंगळुरू येथे सदर हेलिकॉप्टर जात होते. पणजी येथील आयएनएस हंस या नाविक तळावर इंधन भरण्यासाठी हे हेलिकॉप्टर थांबणार होते. मात्र या तळावर उतरतेवेळी हेलिकॉप्टरचा ‘रोटर’ तुटला आणि त्याने पेट घेतला आणि ही दुर्घटना घडली. या वेळी हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या तीनही कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला. सदर दुर्घटना येथील नागरी विमानतळाच्या धावपट्टीवर घडल्याने हवाई वाहतुकीचे वेळापत्रक मात्र विस्कळीत झाले.

Story img Loader