झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करण्यासाठी ईडी त्यांच्या मागावर आहे. मागच्या तीस तासांपासून ईडीचे अधिकारी त्यांचा शोध घेत होते. मात्र मुख्यमंत्री सोरेन सापडत नसल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. काही वेळापूर्वीच हेमंत सोरेन हे सरकारी वाहनातून आपल्या रांची येथील निवासस्थानी आले असल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर आपल्या गाडीतून त्यांनी माध्यमांना हात उंचावून दाखविला. जमीन गैरव्यवहार प्रकरणात ईडीने मुख्यमंत्र्यांवर आरोप ठेवले असून दिल्लीतून काल रात्री उशीरा त्यांची गाडी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरावर ईडीचा छापा, BMW कारसह महत्वाची कागदपत्रं जप्त

Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

उद्या, ३१ जानेवारी रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडी चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्याआधी आज त्यांनी आपल्या झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. ईडीच्या चौकशीसाठी गेल्यानंतर त्यांना अटक केली जाऊ शकते, अशी साशंकता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही या बैठकीला उपस्थित होत्या. जर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली तर कल्पना सोरेन मुख्यमंत्रीपदी येऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्व आमदारांना राजधानी रांचीतच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून त्या अनुषंगाने निर्णय घेतले जाणार आहेत. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) या पक्षांची आघाडी असून झारखंडमध्ये या आघाडीने सरकार स्थापन केलेले आहे.

जेएमएमचे सचिव आणि प्रवक्ते विनोद कुमार सिंह यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आजची बैठक बोलाविण्यात आली होती. बुधवारी मुख्यमंत्र्यांची जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. त्यावरही आमचे लक्ष लागलेले आहे.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन हे २७ जानेवारी रोजी रांचीहून दिल्लीकडे रवाना झाले होते. त्यांनी ईडीला ईमेल करून ३१ जानेवारी रोजी रांचीतील निवासस्थानी दुपारी १ वाजता चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्रीच दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी धाड टाकून त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला.

झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्याजागी त्यांच्या पत्नी मुख्यमंत्री होणार? भाजपा खासदाराचा दावा

त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हेमंत सोरेन हे त्यांच्या निवासस्थानी नसून त्यांचा संपर्कही होत नाही. दरम्यान जेएमएम पक्षाने ईडीची कारवाई असंविधानिक असल्याचा आरोप केला आहे. जेएमएमचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सुप्रियो भट्टाचार्य म्हणाले की, मुख्यमंत्री दिल्लीत एका वैयक्तिक कामासाठी गेले होते. काम पूर्ण झाल्यानंतर ते परत आले. पण सोमवारी रात्रीच त्यांच्याविरोधात केलेली कारवाई ही असंविधानिक आहे. ही राजकीय प्रेरीत कारवाई आहे, असाही आरोप प्रवक्त्यांनी केला.

२० जानेवारीला हेमंत सोरेन यांची चौकशी

२० जानेवारीच्या दिवशी हेमंत सोरेन यांची ईडीने सात तास चौकशी केली होती. ८.४६ एकर जमिनीशी संबंधित हे प्रकरण आहे. प्राप्तीकर आणि प्राप्तीकर विवरण यासंबंधीचे प्रश्न ईडीने हेमंत सोरेन यांना विचारले होते अशीही माहिती समोर आली होती. त्यानंतर आता दहाच दिवसात हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी छापेमारी झाली आहे. यामध्ये त्यांची बीएमडब्ल्यू कार जप्त करण्यात आली आहे तसंच काही कागदपत्रंही जप्त करण्यात आली आहेत.