युरोपीय अंतराळ संस्थेची हर्शेल दुर्बीण अखेर बंद करण्यात आली आहे. गेली तीन वर्षे या दुर्बिणीने विश्वाची अनेक निरीक्षणे नोंदवली होती. प्रकल्प नियंत्रकांनी या दुर्बिणीला काम बंद करण्याचा संदेश काल पाठवला. या दुर्बिणीतील हेलियम शीतक संपले होते. खरेतर या दुर्बिणीचे अपेक्षित कार्य २९ एप्रिललाच संपले होते. ज्या चाचण्या उड्डाणाच्या वेळी केल्या जात नाहीत अशा चाचण्यांसाठी या दुर्बीण रूपात फिरणाऱ्या उपग्रहाचा वापर यापुढेही होत राहणार आहे. या दुर्बिणीतील उपकरणांना केवळ शून्य
तापमानाला थंड ठेवणाऱ्या द्रव हेलियमचा साठा संपल्याने या दुर्बिणीचा उपयोग निरीक्षणांच्या दृष्टीने संपला होता. हा उपग्रह आणखी काही आठवडे चालू राहील व त्यानंतर त्याचे काम हळूहळू बंद होईल. या उपग्रहातील हेलियम संपल्यानंतर डार्मसडॅटच्या युरोपीय अंतराळ कामकाज केंद्राने काही प्रयोग करण्याची दुर्मीळ संधी साधली. या दुर्बिणीने ३५ हजार वैज्ञानिक निरीक्षणे नोंदवली होती तसेच ६०० निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत २५ हजार तासांची वैज्ञानिक माहिती मिळवली होती. १३ ते १४ मे दरम्यान हर्शेल दुर्बिणीतील थ्रस्टर सात तास ४५ मिनिटे प्रज्वलित राहिले त्यानंतर त्यातील इंधन संपले होते.
हर्शेल अंतराळयानाचे व्यवस्थापक मिका श्मिडट् यांनी सांगितले की, जास्तीत जास्त वैज्ञानिक माहिती मिळवणे हा या प्रकल्पाचा हेतू साध्य झाला आहे. पुढील अंतराळयानात वापरली जाणारी काही तंत्रे व सॉफ्टवेअर यांच्या चाचण्यांसाठी त्याचा वापर होत राहील, आमच्यासाठी तो बोनस आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा