युक्रेनवर रशियाकडून ड्रोन, क्षेपणास्त्रत्तांचा मारा
कीव : युद्धविरामाचे राजनैतिक प्रयत्न सुरू असताना, रशियन सैन्याने कीव प्रदेश आणि युक्रेनच्या इतर पाच भागात बुधवारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले, की त्यांनी ३० पैकी २९ हवाई हल्ले परतवून लावले, ज्यात चार क्रूझ क्षेपणास्त्रे, एक किंजल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि २४ शाहेद ड्रोन यांचा समावेश होता.
ड्रोन हल्ल्यांमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी हवाई दलाच्या प्रत्युत्तराचे कौतुक केले. या प्रतिसादाला त्यांनी ‘दैनंदिन यश’ म्हटले आहे. त्यांनी पाश्चात्य भागीदारांना अधिक हवाई संरक्षण प्रणाली पुरवण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा >>> मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची कीर्तिकर यांची तक्रार; ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप
एपी, बैरूत
सर्वोच्च कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लेबनॉनच्या हेजबोलाने बुधवारी उत्तर इस्रायलवर एका दिवसातील सर्वाधिक रॉकेट हल्ले केले. एकीकडे गाझा पट्टीत इस्त्रत्तायल आणि हमासदरम्यान सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने युद्धविरामाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला. या मंजूर झालेल्या प्रस्तावाच्या दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाल्याने यापुढे प्रादेशिक तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून इस्रायल-हमासमध्ये युद्ध सुरू आहे. तेव्हापासून हमासचा इराणसमर्थित मित्र असलेल्या हेजबोलाने इस्रायलमध्ये गोळीबार सुरूच ठेवला आहे. गाझामध्ये युद्धविराम झाला तरच हे हल्ले थांबतील, असे हेजबोलाने म्हटले आहे. तसेच हेजबोलाने मंगळवारी उशिरा आपली अधिकृत प्रतिक्रिया देत करारामध्ये दुरुस्ती करण्याची विनंती केली. त्यामुळे आगामी काळात प्रादेशिक भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे.
हेजाबोलाने बुधवारी इस्त्रत्तायलमध्ये एकूण १३ कारवाया केल्या. यात हेजाबोलाच्या सैनिकांनी इस्त्रत्तायलच्या लष्करी कारखान्यावर क्षेपणास्त्रत्ते डागली. तसेच आयन झेटीम आणि अमिआद येथील इस्त्रत्तायली लष्करी मुख्यालयावर रॉकेट हल्ले केले. या हल्ल्यांनंतर संपूर्ण उत्तर इस्रायलमध्ये भोंगे वाजले. दक्षिण लेबनॉनमधून सुमारे २५० क्षेपणास्त्र सोडल्याचे त्यानंतर लष्कराने सांगितले. युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात मोठा हल्ला ठरला आहे. परंतु काही क्षेपणास्त्रांना रोखण्यात आले, तर काहींना आग लागल्या. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
तालेब अब्दुल्लाच्या हत्येचा बदला
हेजबोलाने ५५ वर्षीय तालेब सामी अब्दुल्ला याच्या हत्येचा बदला म्हणून इस्त्रत्तायलच्या दोन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि रॉकेट डागल्याचे सांगितले. हेजबोलामध्ये हज अबू तालेब म्हणून ओळखला जाणारा आणि युद्ध सुरू झाल्यापासून मारला गेलेला तो सर्वांत वरिष्ठ कमांडर आहे. मंगळवारी रात्री उशिरा दक्षिण लेबनॉनच्या जैय्या गावात इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात हेजाबोलाचे तीन सैनिक ठार झाले होते. यात तालेब अब्दुल्लाचाही समावेश होता.