Israel-Hezbollah War News: हमास विरुद्ध इस्रायल असा वर्षभर संघर्ष उडाल्यानंतर आता इस्रायल विरुद्ध हेझबोला अशा संघर्षाला तोंड फुटले आहे. मागच्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर अनपेक्षित हल्ला करून जवळपास १४०० नागरिकांची हत्या आणि शेकडो जणांचे अपहरण केले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इस्रायलने गाझापट्टीवर जोरदार हल्ले केले. वर्षभरापासून इस्रायल गाझा पट्टीवर हल्ले करत आहे. त्यादरम्यान आता लेबनानमधील हेझबोला या संघटनेशीही इस्रायलचा संघर्ष सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लेबनानमधील हेझबोलाच्या सदस्यांकडे असलेल्या पेजरचा स्फोट होऊन अडीच हजाराहून अधिक लोक जखमी झाले होते. तर अनेकजणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर आता हेझबोलाने उत्तर इस्रायलवर १४० रॉकेट डागले आहेत.

इस्रायलचया लष्कराने सदर हल्ले झाल्याचे मान्य केले आहे. हेझबोलाने या हल्ल्याबाबत माहिती देताना सांगितले की, हवाई दलाचे तळ आणि इस्रायलच्या तोफखाना मुख्यालयाला या हल्ल्याद्वारे लक्ष्य करण्यात आले आहे.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
gadchiroli bhamragarh Naxalite bomb blast
अमित शहांच्या गडचिरोली दौऱ्याआधी भामरागडमध्ये बॉम्बस्फोट, सुदैवाने…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Singapore flagged cargo vessel near Colombo beach in Sri Lanka Fact Check
हत्यारं वाहून नेणाऱ्या इस्रायलच्या जहाजाला लागली आग? VIRAL VIDEO चं नेमकं सत्य काय? वाचा, खरी गोष्ट
flights affected by bomb threat
वाढत्या विमान धमक्यांचा ५१० उड्डाणांवर परिणाम…धमकीखोरांच्या बंदोबस्तासाठी कोणत्या उपाययोजना? किती परिणामकारक?

हे वाचा >> Israel : मोसाद नव्हे ‘युनिट-८२००’ ने लेबनॉनमध्ये पेजर्स, वॉकी-टॉकीचे स्फोट घडवले; इस्रायलच्या नव्या गुप्तचर यंत्रणेबद्दल जाणून घ्या

दुसरीकडे इस्रायलच्यावतीने या हल्ल्याचे काही व्हिडीओ एक्सवर शेअर केले आहेत. तसेच हेझबोलाला या हल्ल्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशाराही इस्रायलने दिला आहे.

Israeli strike in the southern suburbs of Beirut
इस्रायलचा लेबनानची राजधानी बैरुतवर हल्ला (REUTERS/Mohamed Azakir)

इस्रायलचा राजधानी बैरुतवर हल्ला

दरम्यान इस्रायलनेही प्रत्युत्तरा दाखल लेबनानची राजधानी बैरुतवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात आठ नागरिक ठार झाले असून ५९ लोक जखमी झाले असल्याचे लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

हेझबोलाबरोबर युद्धाचे काय परिणाम होऊ शकतात?

हेझबोला गटाकडे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी उत्तर इस्रायलवर हल्ला करण्याची प्रचंड लष्करी क्षमता आहे, तसेच तेल अवीवसारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या शहरांसह ज्यू राज्याच्या इतर भागांवरदेखील हल्ला करण्याची क्षमता आहे. हेझबोलाने २००६ च्या इस्रायलबरोबरच्या युद्धात आपली लष्करी क्षमता दाखवली होती. हे युद्ध ३४ दिवस चालले. त्या दरम्यान १६५ इस्रायली ठार झाले (१२१ आयडीएफ सैनिक आणि ४४ नागरिक) आणि इस्रायलच्या अर्थव्यवस्थेचे आणि पर्यटन उद्योगाचे लक्षणीय नुकसान झाले. या युद्धात सर्वात मोठे नुकसान हेझबोला आणि लेबनीजचे झाले. त्यांच्याकडील मृतांची संख्या किमान १,१०० होती. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) या गटाला निष्प्रभ करण्यातही हेझबोला अयशस्वी ठरले.