Lebanon : लेबनॉनमध्ये पेजर स्फोट झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी समोर आली होती. या पेजर स्फोटमुळे लेबनॉनमध्ये मोठी खळबळ उडाली. या घटनेत तब्बल १० जणांचा मृत्यू झाला, तर तब्बल २,८०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पुन्हा १८ सप्टेंबर रोजी वॉकीटॉकीसह काही इलेक्ट्रॉनिक वस्तुमध्ये स्फोट झाले. या वॉकीटॉकीच्या स्फोटांमध्येही १० पेक्षा जास्त लोकांनी जीव गमवला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून लेबनॉनमध्ये घडलेल्या या स्फोटांच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.

यानंतर आता हेझबोलाहचा नेता हसन नसराल्लाहने एका भाषणात बोलताना ‘ही युद्धाची घोषणा समजा’, असं विधान केलं आहे. दरम्यान, हेझबोलाहचे नेता हसन नसराल्लाहने म्हटलं की, “इस्रायलने यंत्राचा स्फोट करून युद्धाची घोषणा केली आहे.” हसन नसराल्लाहच्या या विधानानंतर इस्त्रायली लढाऊ विमाने लेबनॉनच्या अनेक भागांवरून उडताना दिसली असल्याचं स्काई न्यूजने एका वृत्तात म्हटलं आहे.

bucha witches
रशियन सैन्याविरोधात युद्धात उतरणाऱ्या युक्रेनच्या ‘बुचा विचेस’ कोण आहेत?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
America Britain weapons supply ukraine
विश्लेषण: अमेरिका, ब्रिटनकडून युक्रेनला शस्त्रास्त्रांची संजीवनी… रशियाविरुद्धचे युद्ध निर्णायक टप्प्यावर?
Putin warns NATO
विश्लेषण: … तर युक्रेन युद्ध रशिया विरुद्ध ‘नाटो’ असे बदलेल… पुतिन यांची धमकी किती गंभीर?
thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
loksatta analysis osama bin laden s son hamza is alive preparing to attack
ओसामा बिन लादेनचा मुलगा जिवंत? अल कायदाचा म्होरक्या बनून ९/११ सारख्या हल्ल्याची तयारी करतोय? नवीन माहितीमुळे खळबळ!
pakistani army chief asim munir
Kargil War : २५ वर्षांनंतर पाकिस्तान सैन्याने मान्य केली कारगिल युद्धातील भूमिका; लष्करप्रमुख असीम मुनीर म्हणाले, “आमच्या सैनिकांनी…”
Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?

हेही वाचा : Lebanon Walkie Talkies Blasts : लेबनानमधील स्फोटानंतर वॉकीटॉकी बनवणाऱ्या जपानी कंपनीकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “आम्ही २०१४ नंतर…”

तसेच हेझबोलाहचे नेता हसन नसराल्लाहने इस्रायलवर जोरदार टीका केली. नसराल्लाहने आपल्या भाषणात पेजर आणि वॉकीटॉकी हल्ल्यांसाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. असं म्हटलं की, इस्रायलने निरपराध लोकांच्या आणि मुलांच्या जीवाकडे लक्ष दिलं नाही. इस्रायलने सुमारे ४००० पेजर्सला लक्ष्य केले. मृतांपैकी काहींचा अद्याप अधिकृत आकडेवारीत समावेश झालेला नाही, असं नसराल्लाहने म्हटलं आहे. तसेच नसराल्लाहने इस्रायलवर एकाच वेळी ४००० लोकांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

हिजबुल्लाचा प्रमुखाने असंही म्हटलं की, “हा सर्व दहशतवाद आहे. आम्ही याला हत्याकांड असंच म्हणतो, हा गंभीर अपराध आहे किंवा युद्धाची घोषणा आहे. अनेक पेजर सेवाबाह्य किंवा बंद झाले आहेत. तर काही लोकांना पेजर वितरित केले गेले नाहीत, अजूनही आमच्या गोदामांमध्ये आहेत”, असं म्हटलं आहे.

पेजर-स्फोटांमुळे उडाली मोठी खळबळ

लेबनीज नागरिकांकडील जवळपास १००० पेजर्सचा स्फोट झाला मंगळवारी झाल्याचे वृत्त समोर आले होते. जवळपास तासभर विविध ठिकाणी – भाजी बाजारांत, दुकानांमध्ये, कार्यालयांत, काही प्रसंगी मोटारीत किंवा बाइक चालकांच्या खिशात स्फोट झाल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. प्रामुख्याने राजधानी बैरूट आणि इस्रायल-लेबनॉन सीमाभागातील शहरांमध्ये स्फोट झालेले आहेत. सीमा भागामध्ये हेझबोलाचे प्राबल्य आहे. हेझबोला आणि इराण समर्थित इतर संघटनांना धडा शिकवण्याचा इशारा इस्रायलने आदल्याच दिवशी दिला होता.

पेजरमध्ये स्फोट झालेच कसे?

हे बहुतेक पेजर हेझबोलाने तस्करी करून लेबनॉनमध्ये आणले होते. पेजरमधील लिथियम बॅटरीचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण अशा प्रकारे सदोष पेजरही इतक्या मोठ्या प्रमाणात ज्वालाग्राही कसे होऊ शकतात, हे कोडे उलगडलेले नाही. लिथियम हे बहुतेक आधुनिक उपकरणांमध्ये वापरले जाते आणि उच्च उष्णतेमध्येही त्यांचा स्फोट होत नाही म्हणून लिथियम बॅटरी सुरक्षित मानली जाते. तरीही पद्धतशीरपणे ज्या प्रकारे स्फोट झाले, तो इलेक्ट्रॉनिक युद्धाचा प्रकार असू शकतो का, याविषयी सामरिक आणि तंत्र विश्लेषक गोंधळलेले आहेत.