अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग आलाय. १६ ऑगस्ट रोजी देशावर ताबा मिळवल्यानंतर अमेरिकन सैन्य माघारी गेल्यावर आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन करण्यासाठी आणि नवीन मंत्रीमंडळ बनवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. सर्व सहकारी गटांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी तालिबानला किमान तीन दिवसांचा अवधी लागणार आहे. तीन दिवसांनंतर तालिबानकडून सत्ता स्थापनेसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तालिबानचे सांस्कृतिक आयोगाचे सदस्य बिलाल करीमीने संघटनेचा प्रमुख नेता हिबतुल्लाह अखुंदजादाच्या नेतृत्वाखाली यासंदर्भातील चर्चा होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर सरकारच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी तालिबानचा प्रसिद्ध नेता मुल्ला अब्दुल गनी बरदारवर सोपवण्यात येणार आहे.

नवीन सरकारमध्ये पवित्र आणि सुशिक्षित लोकांचा समावेश असे आणि मागील २० वर्षांपासून सरकारमध्ये असणाऱ्यांना संधी दिली जाणार नाही, अशी माहिती कतारमध्ये तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे उपप्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजईने दिलीय. विशेष म्हणजे सरकारमध्ये महिलांनाही स्थान दिलं जाईल असंही अब्बास म्हणालेत. सरकार हे अखुंदजादाच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचे संकेत तालिबानने दिलेत.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
raj thackeray rally in thane
सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे ४८ तासात उतरवेन ; राज ठाकरे
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
shahbaz sharif government approves bill to extend army chief service tenure in pakistan
विश्लेषण : पाकिस्तानात शरीफ सरकारचा आत्मघातकी निर्णय… लष्करप्रमुखांचा कार्यकाळ दहा वर्षे… भारताची डोकेदुखी वाढणार?
amit shah remark on muslim reservation in ghatkopar
मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन

नक्की वाचा >> RSS हे भारतामधील तालिबानी, धर्माच्या नावावर देशात फूट पाडतात; RJD च्या नेत्याची टीका

पाजव्होक या अफगाणिस्तानमधील वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार तालिबानने सखउल्लाहकडे कार्यवाहक शिक्षा प्रमुख. अब्दुल बाकीला उच्च शिक्षण कार्यवाहक प्रमुख, सदर इब्राहिमला कार्यवाहक गृहमंत्री, गुल आगाला वित्तमंत्री, मुल्ला शिरीनला काबूलचा राज्यपाल, हमदुल्ला नोमानीला काबूलचा महापौर आणि नजीबुल्लाहला गुप्तहेर संघटनेचा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली जाणार आहे. यापूर्वी तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदला संस्कृति आणि सूचना मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलंय.

मुख्य नेता होणारा हिबातुल्लाह अखुंदजादा आहे तरी कोण?

तालिबानने १६ ऑगस्ट २०२१ रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा मिळवला. त्यानंतर तालिबानचे अनेक टॉप कमांडर आणि महत्वाचे नेते एक एक करुन देशाच्या राजधानीमध्ये दाखल होऊ लागले. यामध्ये मागील अनेक वर्षांपासून फरार घोषित करण्यात आलेल्या तालिबानच्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. मात्र असं असतानाही एका व्यक्तीबद्दल अद्यापही कोणतीच माहिती समोर आलेली नाही. ती व्यक्ती म्हणजे तालिबानचा सर्वोच्च नेता हिबातुल्लाह अखुंदजादा. अखुंदजादा हा अफगाणिस्तानमध्येच असून लवकरच तो पहिल्यांदाच जनतेसमोर येईल असं तालिबानने स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा >> “कदाचित माझ्या मुलाच्या ‘त्या’ इच्छेसाठी मी सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला असावा”; बायडेन यांचं भावनिक वक्तव्य

कधी झाला तालिबानचा नेता?

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार तालिबानचा मुख्य प्रवक्ता जबनुल्लाह मुजाहिदने अखुंदजादा हा कंदाहारमध्ये असल्याची माहिती दिली आहे. अखुंदजादा हा सुरुवातीपासून येथेच वास्तव्यास असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच आता देशामध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर हिबातुल्लाह पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या जगासमोर येणार आहे. अखुंदजादा हा संघटनेमध्ये कमांडर पदावर असून २०१६ पासून तो तालिबानचं नेतृत्व करतोय. ज्यावेळेस तालिबान आता संपुष्टात येत आहे असं वाटतं होतं तेव्हाच अखुंदजादाच्या हातात संघटनेचं नेतृत्व आलं. त्याने या संघटनेची बांधणी करुन अखेर अफगाणिस्तानच्या सैन्याला पराभूत करत देशात पुन्हा एकदा तालिबानचं राज्य आणण्यामध्ये मोलाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जातं.

अद्याप जगासमोर आलाय एकच फोटो

अखुंदजादाबद्दल अफगाणिस्तानमध्ये मागील पाच वर्षांपासून गूढ कायम आहे. त्याच्याबद्दल येथील लोकांना फारच कमी माहिती असून देशाला संघर्षाच्या खाईत ढकलणाऱ्या तालिबानच्या या मुख्य नेत्याची दहशत मात्र फार आहे. अखुंदजादा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नाही. केवळ इस्लाममधील महत्वाच्या दिवसांना त्याचा एखादा संदेश तालिबानच्या माध्यमातून जारी केला जातो. तालिबाननेच अखुंदजादाचा एक फोटो जारी केला होता. त्या फोटो व्यतिरिक्त अखुंदजादाबद्दल कोणतीही कागदपत्रं किंवा इतर माहिती उपलब्ध नाही. अखुंदजादा कधीच जनतेच्या समोर आलेला नाही असं सांगितलं जातं. ऑगस्टमध्ये देशातील सत्ता काबीज केल्यानंतरही तालिबानने अखुंदजादाबद्दलचं गूढ अद्याप कायम ठेवलं आहे. एकीकडे तालिबानला मदत करणाऱ्या वेगवेगळ्या गटांचे नेते काबूतमधील मशिदींमध्ये मोकळेपणे आपआपल्या गटांचा प्रचार करत असताना ज्यांनी सत्ता मिळवली त्या तालिबानचा म्होरक्या मात्र अद्यापही भूमिगत आहे.

नक्की वाचा >> तालिबानचं अभिनंदन करताना ‘अल-कायदा’ने केला काश्मीरचा उल्लेख; म्हटलं, “इतर इस्लामिक प्रदेशही…”

तालिबानचा संस्थापक आणि गुप्तता…

तालिबानने आपल्या प्रमुख नेत्याबद्दल अशी गुप्तता बाळगण्याचा इतिहास फार जुना आहे. तालिबानचा संस्थापक मुल्ला मोहम्मद ओमर सुद्धा अशाच गूढ हलचाली आणि सार्वजनिक जिवनामध्ये सहभागी न होेण्यासाठी ओळखला जायचा. १९९० मध्ये तालिबानने पाहिल्यांदा सत्ता मिळवली तेव्हा तो काबूलमध्येच राहायला मात्र तो सार्वजनिकपणे फार कमी वेळा समोर यायचा. ओमर तर तालिबानच्या प्रतिनिधीमंडळाचीही भेट फार कमी वेळा घ्यायचा. कंधहारमध्ये ज्या ठिकाणी तालिबानची स्थापना करण्याचा निर्णय झाला तिथेच ओमर रहायचा. आजही ओमरचे शब्द हे तालिबान्यांकडून अलिखित कायद्याप्रमाणे मानले जातात. तालिबानमध्ये ओमर इतका मोठा नेता अद्याप झालेला नाही.

नक्की वाचा >> Taliban vs Northern Alliance: संघर्ष शिगेला… ३५० तालिबान्यांचा खात्मा केल्याचा अलायन्सचा दावा; तर तालिबानकडून महत्वाचा पूल उद्धवस्त

…म्हणून तो समोर येत नाही

आंतरराष्ट्रीय क्रायसेस समूहाचे आशियामधील प्रमुख लॉरल मिलर यांनी अखुंदजादाने ओमरप्रमाणेच एकटं राहण्याचा निर्णय घेतलाय. अखुंदजादाआधी तालिबानचा प्रमुख असणाऱ्या मुल्लाह अख्तर मंसूरचा अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर अखुंदजादाने सुरक्षेच्या दृष्टीकोनामधून अशाप्रकारचं जीवन स्वीकारल्याचं मिलर सांगतात. मिलर यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना तालिबानच्या नेत्यांनी लवकरच त्यांचा मुख्य नेता म्हणजेच अखुंदजादा जगासमोर येणार असल्याचं म्हटलंय. अखुंदजादा मरण पावलाय अशा बातम्या अनेकदा येऊन गेल्या असून त्या बातम्या खोडून काढण्यासाठी तो जगासमोर येण्याची शक्यता आहे. मात्र जगासमोर आल्यानंतर अखुंदजादावरही मंसूरप्रमाणे वेळ येईल अशी भीती व्यक्त केली जात असल्याने तो जगासमोर येण्यासंदर्भात संभ्रमात असल्याचं सांगितलं जातंय.

नक्की वाचा >> “…म्हणून अफगाणिस्तान सोडण्याशिवाय काही पर्याय नव्हता”; सैन्य माघार घेण्याचं कारण सांगताना बायडेन यांनी केला चीन, रशियाचा उल्लेख

अखुंदजादा समोरील आव्हानं…

अखुंदजादा हा मागील अनेक वर्षापासून कुठे आहे याबद्दल माहिती नसल्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही तो दिसून न आल्याने वेळोवेळी त्याच्याबद्दलच्या अनेक बातम्या समोर आले. काहींनी अखुंदजादाला करोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं तर काहींनी तो बॉम्ब हल्ल्यात मेल्याचा दावा केला. मात्र हे सर्व दावे पुराव्यानिशी सिद्ध करता आले नाही. अखुंदजादाने आपली गोपनियता नाजूक काळामध्येही कायम ठेवण्यात यश मिळवलं. २०१५ मध्ये तालिबानने त्यांचा प्रमुख नेता मंसूरचा मृत्यू झाल्याचं अनेक वर्षे लपवून ठेवल्यानंतर अकेर जाहीर केलं. यानंतर सत्तेसाठी तालिबानमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला. या रक्तरंजित संघर्षामुळे तालिबानमध्ये फूट पडू लागली. मात्र त्यानंतर नेतृत्व करणाऱ्या अखुंदजादाने तालिबानला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. आता सत्ता आल्यानंतर तालिबानला मदत करणाऱ्या लहान मोठ्या गटांबरोबर सामंजस्य वाढवण्यासाठी तालिबान आणि अखुंदजादा प्रयत्न करतील असं सांगितलं जात आहे. हे काम आव्हानात्मक असल्याचं अफगाणिस्तानसंदर्भातील जाणकार सांगात.

नक्की वाचा >> “…तर किमान बॉम्ब तरी टाका”; अफगाणिस्तानसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांची बायडेन प्रशासनाकडे मागणी

…तर तालिबानमध्ये पडणार फूट? 

सत्तेची हाव तालिबानमधील अंतर्गत संघर्षाला पुन्हा खतपाणी घालू शकते. त्यामुळे मागील अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेली सत्ता टीकवणे, अफगाणिस्तानमधील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे यासारखी मुख्य आव्हानं आता तालिबान आणि अखुंदजादासमोर आहेतच शिवाय तालिबानची एकजूट कायम कशी राहील यासाठीही अखुंदजाला काम करावं लागणार आहे.