व्हॉट्स अ‍ॅप’ वापरणा-या अनेकांनी आपला नंबर सेव्ह आहे त्या प्रत्येकाला दाखवणारा ’ं२३ २ील्लह्ण हा पर्याय लपवता यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार, आता व्हॉट्स अ‍ॅपमध्ये बदल करण्यात आला आहे. वॉट्स अ‍ॅप युजर्सना आता लास्ट सीन’, प्रोफाईल फोटो व स्टेटसदेखील अन्य युजर्स पासून लपवता येणार आहे.
फेसबुकने व्हाट्स अ‍ॅपला विकत घेतल्यानंतर व्हाट्स अँपच्या प्रायव्हसीला प्राधान्य देत दोन नवे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
 आधी हा पर्याय ओएसवर उपलब्ध होता. मात्र आता अँड्रॉईडवरही उपलब्ध करण्यात आले आहेत. सध्या गुगल प्ले स्टोरमध्ये ही सुविधा उपलब्ध नसल्याने युझर्सना व्हाट्स अ‍ॅपच्या वेबसाईटवर जाऊन नव्याने अँप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. तसेच अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या फोनमधील अँड्रॉईडचे व्हर्जन हे २.१ च्या पुढील असावयास हवे
दोनच दिवसांपूर्वी फेसबुकने तब्बल १९ अब्ज डॉलर्स मोजून व्हॉट्स अ‍ॅपला विकत घेतले.