लोकप्रतिनिधींबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली : आमदार – खासदारांविरोधातील खटले उच्च न्यायालयांच्या परवानगीशिवाय मागे घेऊ नयेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. लोकप्रतिनिधींविरोधातील खटल्यांची सुनावणी कोणत्याही अडथळ्यांशिवाय तातडीने व्हावी, असे खटले प्रलंबित राहू नयेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

कठोर देखरेख व नियम असतानाही खासदार आणि आमदारांवरील खटले दोन वर्षांच्या काळात वाढले आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये खटल्यांची संख्या ४१२२ होती. ती सप्टेंबर २०२० मध्ये ४८५९ झाली, असे सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सांगण्यात आले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील विजय हंसारिया यांना न्यायमित्र म्हणून नियुक्त केले आहे. लोकप्रतिनिधींवरचे खटले जलदगती पद्धतीने चालवण्यात यावेत अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर हंसारिया यांनी लोकप्रतिनिधींवरील खटले रेंगाळण्याची कारणे क थन करताना सांगितले की, राज्य सरकारांनी काही खटले मागे घेतले, न्यायकक्षेचे वाद निर्माण केले. सदर खटल्यांसाठी न्यायिक अधिकाऱ्यांना दोन वर्षांची मर्यादा घालून दिली. न्यायमित्र हंसारिया यांचा अहवाल वकील स्नेहा कलिता यांनी सादर केला.

justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
provide government guest houses for interfaith couples says bombay high court
आंतरधर्मीय जोडप्यांसाठी अतिथीगृहे उपलब्ध करून द्या; उच्च न्यायालयाची सूचना
There has been demand for law requiring judges to disclose their assets like MPs and mlas
न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…
Hearing on Place of Worship Act to be held in new bench Six petitions filed by Hindutva organizations
प्रार्थनास्थळ कायद्यावर सुनावणी नव्या खंडपीठाकडे; हिंदुत्ववादी संघटनांकडून सहा याचिका दाखल
Loksatta samorchya bakavarun Supreme Court Article Prohibition of conversion of places of worship
समोरच्या बाकावरून: हे सगळे कुठपर्यंत जाणार आहे?

केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक, सक्तवसुली संचालनालय यांच्या संचालकांनी खासदार व आमदारांवरील खटल्याच्या चौकशीबाबत स्थितीदर्शक अहवाल वेळोवेळी सादर करावेत अशी अपेक्षा असताना ते सादर केले जात नाहीत असे न्यायमित्रांच्या अहवालात म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी आहे.

Story img Loader