तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बेहिशेबी संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणी शिक्षेवरील अपिलावर आज कर्नाटक उच्च न्यायालय निकाल देणार आहे. न्यायालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आहे.
जयललिता यांच्यावर ६६.५५ कोटींची बेहिशेबी संपत्ती बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तामिळनाडूमध्ये सुनावणीवर परिणाम होण्याच्या शक्यतेने हा खटला कर्नाटक विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता. यावर  विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मिशेल डिकुन्हा यांनी २७ सप्टेंबरला जयललिता यांना चार वर्षांचा कारावास आणि १०० कोटींचा दंड ठोठावला होता. तसेच त्यांच्या तीन साथीदारांना प्रत्येकी १० कोटींचा दंड ठोठावला होता. यामुळे जयललितांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
या निकालाविरोधात त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मागिल तीन महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. यावर उच्च न्यायालयाचे एकसदस्यीय खंडपीठाचे न्यायाधीश सी. आर. कुमारस्वामी सोमवारी निकाल देणार आहेत.
जयललिता समर्थकांकडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून उच्च न्यायालयाच्या १ कि.मी.च्या आवारात सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश देण्यात आला आहे.
अद्रमुक कार्यकर्त्यांची प्रार्थना
चेन्नई: बेहिशेबी संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणात अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या विरोधात त्यांनी केलेल्या अपिलावर कर्नाटक उच्च न्यायालय सोमवारी निर्णय देणार असल्यामुळे, निकाल त्यांच्या बाजूने लागावा अशी प्रार्थना करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये पूजा केली, तसेच मिरवणुका काढल्या. जयललिता यांचे मुख्यमंत्रीपदी पुनरागमन व्हावे यासाठीच्या प्रार्थनांचा भाग म्हणून पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणांवर पारंपरिक ‘दुधाच्या हंडय़ांची आध्यात्मिक मिरवणूक’ काढली, मंदिरांमध्ये दिवे लावण्यात आले

Story img Loader