High School Firing News : अमेरिकेमधील जॉर्जियाच्या विंडरमधील एका शाळेत बुधवारी अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात १४ वर्षीय विद्यार्थ्याला अटक करण्यात आल्याचं वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. जॉर्जिया येथील शाळेत गोळीबाराची घटना घडल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अनेक पालकांनी त्यांची मुले सुरक्षित आहेत की नाही हे पाहण्यासाठी शाळेत धाव घेतली होती.

ही घटना घडल्यानंतर शाळेच्यावतीने स्पष्टीकरण देत सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच एका निवेदनात म्हटलं की, “या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या प्रति मी शोक व्यक्त करतो. त्यांना आपले प्राण हिंसाचारामुळे गमवावे लागले.”

greta thunberg arrested
Greta Thunberg Arrested: ग्रेटा थनबर्गला अटक, कोपनहेगन पोलिसांची कारवाई; स्वत: Video पोस्ट करून दिली माहिती!
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Jaydeep Apte, the sculptor of the Shivaji statue that collapsed in Sindhudurg arrested.
Jaydeep Apte : शिल्पकार जयदीप आपटेला कशी झाली अटक? ‘या’ प्रश्नांची उत्तरं उलगडणार?
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका

हेही वाचा : करवाढीवरून ट्रम्प-हॅरिस यांच्यात मतभेद

शाळेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, घटना नियंत्रणात आहे आणि विद्यार्थ्यांना दुपारी सोडण्यात आलं होतं. एबीसी न्यूजला प्रत्यक्षदर्शी विद्यार्थी सर्जियो कॅल्डेराने सांगितलं की, तो रसायनशास्त्राच्या वर्गात होता. त्यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यावेळी शिक्षकाने शाळेचा दरवाजा उघडला तेवढ्यात गोळीबाराचा आवाज येत होता. यानंतर शाळेचा दरवाजा बंद केला. मात्र, बाहेरून गोळ्यांचा आवाज आणि किंचाळण्याचा आवाज सुरु होता.

दरम्यान, ही गोळीबाराची घटना का घडली? याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. मात्र, या गोळीबाराच्या घटनेमध्ये दोन विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आता १४ वर्षीय विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. तसेच या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, यूएसमध्ये गेल्या दोन दशकांत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शेकडो गोळीबाराच्या घटना घडल्याचं सामोर आलं आहे. २००७ मध्येही अशाच प्रकारे व्हर्जिनिया टेकमध्ये ३० हून अधिक मृत्यू झाल्याची घटना घडली होती.