देशातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत करोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. मागील २४ तासांत सात हजार ४६६ नवे रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात वाढलेली ही सर्वाधिक संख्या आहे. शहरातून स्थलांतर केलेल्यांमुळे आता करोनानं ग्रामीण भागांतही शिरवाक केल्याचं पाहायला मिळतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील २४ तासांत देशात १७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ४७०६ जणांचा करोनानं बळी घेतला आहे. मृत्यूंच्या बाबतीत भाराताने चीनलाही मागे टाकले आहे. भारतामध्ये एकूण करोनाग्रस्तांची संख्या एक लाख ६५ हजार सातशे ९९ झाली आहे. यापैकी ८९ हजार ९८७ जणांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशातील ७१ हजार १०५ जणांनी करोनावर मात केली आहे.

करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून १७ लाख रुग्ण आहेत. करोनाबाधित रुग्णसंख्येत भारत नवव्या स्थानी असून भारताच्या आधी ब्राझिल, रशिया, इंग्लंड, स्पेन, इटली, फ्रान्स आणि जर्मनीचा क्रमांक आहे. चीन १४ व्या क्रमांकावर असून तुर्की, इराण आणि पेरु अनुक्रमे १०, ११ आणि १२ व्या क्रमांकावर आहेत. भारतामध्ये करोनाच्या आतापर्यंत ३३ लाख चाचण्यात करण्यात आल्या आहेत. तुलनेत अमेरिकेत १.५ कोटी, रशियात ९७ लाख, जर्मनीत ४० लाख, इंग्लंडमध्ये ३८ लाख, इटलीत ३६ लाख आणि स्पेनमध्ये ३५ लाख कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेच चाचण्यांचं प्रमाणं पाहिलं जात तेव्हा तेव्हा भारत पहिल्या १०० देशांतही आढळत नाही अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highest spike of 7466 new covid19 cases in the last 24 hours nck