कर्नाटकातला हिजाबचा वाद आता चांगलाच चिघळल्याचं चित्र आहे. उडुपीचे भाजपा आमदार के रघुपती भट यांनी म्हटले आहे की, हिजाबच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे फोन येत आहेत. कर्नाटकात हिजाबच्या वादाचं उगमस्थान असलेल्या उडुपी येथील प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर वुमनच्या विकास समितीचे अध्यक्ष असलेले भट यांनी शुक्रवारी उडुपी येथे पत्रकारांना सांगितले की, त्यांना आलेले बहुतेक कॉल हे परदेशातून आलेले इंटरनेट कॉल्स होते.

भाजपा आमदार भट म्हणाले की फोन करणारे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत जे त्यांच्यासाठी नवीन नाही. हिजाबच्या मुद्द्यावर जर त्यांनी ठाम भूमिका घेतली तर त्यांना अधिक लक्ष्य केले जाईल, असा इशारा आपल्याला मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. भट म्हणाले की त्यांना स्थानिक नंबरवरून अनेक कॉल्स आले आणि त्यांनी राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र याबद्दलची माहिती दिली. भट म्हणाले की त्यांना यापूर्वीही अशा अनेक धमक्यांना सामोरे जावे लागले आहे आणि या प्रकाराला ते घाबरले नाहीत. द प्रिंट या संकेतस्थळाने पीटीआय वृत्तसंस्थेचा हवाला देत याबद्दल वृत्त दिलं आहे.

Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
Image of Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”
Laxman Hake On Manoj Jarange Patil MLA Suresh Dhas
Lakshman Hake : “संतोष देशमुखांच्या हत्येच्या घटनेचं गांभीर्य…”, लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे अन् सुरेश धसांवर हल्लाबोल
What Suresh Dhas Said About Walmik Karad?
Suresh Dhas : “संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना मोक्का लावा, यांचा ‘तेरे नाम’ मधला सलमान…”; सुरेश धस यांची टीका

हेही वाचा – ‘हिजाब’चे राज्यभर धर्मातीत समर्थन; विरोधानंतर वापर आणि मागणीत वाढ, महिलाहक्काचा आग्रह

त्यांनी दावा केला की उडुपीमधील मुस्लीम त्यांच्यासोबत आहेत आणि जिल्ह्यातील काझींनी या मुद्द्यावर त्यांना पाठिंबा दिला आहे. भट यांनी पुनरुच्चार केला की उडुपी येथील उडुपी पीयू कॉलेजमधील सहा विद्यार्थिनी ज्या वर्गात हिजाब घालण्याचा आग्रह धरतात त्यांची काहींनी दिशाभूल केली होती. फोन, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून आलेल्या सर्व धमक्यांना त्यांनी केवळ कॉलेजमधील गणवेश आणि शिस्त या विषयावर चर्चा करून प्रत्युत्तर दिल्याचे आमदार भट यांनी सांगितलं.

Story img Loader