हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे या भागातील यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी रस्त्याचे नदीमध्ये रुपांतर झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनादेखीस घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे येथे पुरस्थिती निर्माण झाली असून या संकटामुळे आतापर्यंत २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण बेपत्ता असून बचाव पथकाच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला जात आहे. मागील २४ तासांपासून येथे मुसळधार पाऊस सुरू आहे.

हेही वाचा >> Video : “…त्यानंतर मी पूर्णपणे बरा झालो,” ‘भारत के राजीव’ म्हणत काँग्रेसने शेअर केला अटल बिहारी वाजपेयी यांचा जुना व्हिडीओ

राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस असून येथे ३४ ठिकाणी भूस्खलन तसेच पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब-हिमाचाल प्रदेश सीमेजवळ कांग्रा जिल्ह्यात असलेला एक रेल्वे रुळदेखील कोसळला आहे. मुसळधार पावसामुळे येथे नदीला पूर आला होता. याच कारणामुळे हा पूल कोसळला आहे. चंबा येथील बनेट गावातही भूस्खलन झाल्यामुळे येथे तीनजणांचा मृत्यू झाला. यातील दोघांचा मृतदेह हाती लागला असून दिसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

हेही वाचा >> “उत्पादन शुल्क घोटाळ्यात मनीष सिसोदिया प्रमुख आरोपी पण…” अरविंद केजरीवाल यांचे नाव घेत भाजपाने केला मोठा दावा

उत्तराखंडमध्ये ढगफूटी

हिमाचल प्रदेशातील कांगडा, चंबा, बिलासपूर, सिरमौर आणि मंडी या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुल्लूमध्येही मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती असून येथील सर्व शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय उत्तराखंडमध्ये सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे पुराचा धोका वाढला आहे.

आठवडाभर मध्यम ते मुसळधार पाऊस

सध्या हिमाचल प्रदेश राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील आठवडाभर अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांप्रती मुख्यमंत्री जयमराम ठाकूर यांनी शोक व्यक्त केला असून जिल्हा प्रशासन, बचाव व पुनर्वसन विभागाला जलद गतीने मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा >> VIDEO : हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; ९० वर्ष जूना रेल्वे पूल पत्त्यासारखा कोसळला

७४२ रस्ते बंद, २३२ कोटी रुपयांची मदत जाहीर

हिमचाल प्रदेशमधील सध्याची पुरस्थिती लक्षात घेऊन येथील राज्य प्रशासनाने शनिवारी तातडीची बैठक घेऊन २३२ कोटींचा आपत्कालीन निधी मंजूर केला आहे. सध्याच्या पुरस्थितीमुळे येथील एकूण ७४२ रस्ते बंद करण्यात आले आहेत.

Story img Loader