हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचलच्या सोलानमध्ये ढगफुटी झाल्याने त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला राजधानी शिमल्यात दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली २० जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच मंडीतल्या पराशर येथील बागी पूल वाहून गेला आहे. ज्यामुळे नदीच्या पलिकडे २५० लोक अडकले आहेत. अशीच काहीशी परिस्थिती उत्तराखंडची आहे. उत्तराखंडमधल्या मालदेवता येथील देहरादून डिफेन्स कॉलेजची इमारत कोसळली आहे. राज्यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोलान जिल्ह्यातील कंडाघाट उपविभागातील जडोंन गावात ढगफुटीमुळे दोन घरं कोसळली असून त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. बचाव पथकांनी इथे अडकलेल्या दोन जणांना वाचवलं आहे. शिमल्यातील समरहिल येथील शिव मंदिराला भूस्खलनाचा तडाखा बसला आहे. सकाळी येथे पूजेसाठी आलेले २० भाविक मंदिर कोसळल्यानंतर मंदिराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव पथकाकडून डेब्रिज हटवण्याचं काम सुरू आहे. परंतु, हा ढिगारा इतका आहे की अद्याप एकही व्यक्ती सापडलेली नाही.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
samruddhi expressway 233 deaths
दोन वर्षे, दीड कोटी वाहने, १४० अपघात, २३३ मृत्यू!
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
two daughters of a sugarcane cutter died
ट्रॅक्टर अपघातात ऊसतोड मजुराच्या दोन्ही मुलींचा मृत्यू
bjp leader and mlc yogesh tilekar uncle satish wagh killed after kidnapped in pune
भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून

मंडी येथील नागचला येथे ढगफुटीनंतर पर्जन्यवाहिनीतला बराच कचरा वाहून महामार्गावर आला आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागचला येथे ढगफुटी झाली असली तरी येथील रहिवासी घरं, दुकानं, वाचली आहेत. परंतु मंडी ते कुल्लू या दोन ठिकाणांना जोडणारा महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. जेसीबी मशीनच्या सहाय्याने महामार्गावरील डेब्रिज हटवण्याचं काम सुरू आहे.

हे ही वाचा >> ६८ हजारांहून अधिक जवान, ९० रणगाडे अन्…; गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हवाई दलाने केलं होतं ‘एअरलिफ्ट’

हिमाचल प्रदेशमधील शिमला, चंबा, कांगडा, कुल्लू, मंडी, लाहौल स्पिती आणि किन्नौर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांना पाऊस आणि पूराचा धोका असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालयं आणि शिक्षण संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. राज्यातले ३०२ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. भूस्खलनानंतर तब्बल २०० बसेस वेगवेगळ्या ठिकाणी अडकल्या आहेत. तसेच ११८४ ट्रान्सफॉर्मर्स बिघडले असून अनेक भागांमधील वीज गेली आहे.

Story img Loader