करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अत्यावश्यक वाहतूक वगळता इतर वाहतूक व्यवस्था बंद आहेत. यामुळे गेल्या काही दिवसात प्रदूषणात कमालीची घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हवेत उडणारे सुक्ष्म कण नष्ट झाले आहेत. प्रदूषणात कमालीची घट झाल्याने आता दृश्यमानता वाढली आहे. त्यामुळे सहारनपूरमधून थेट हिमालयाची शिखरं दिसू लागली आहेत. थेट हिमालयाचं दर्शन होत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. तसेच इतक्या लांबून घेतलेले हिमालयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सहारनपूर देहरादूनजवळीत पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्हा आहे. इतक्या लांबून हिमालयाचं शिखरं दिसू लागल्याने सहारनपूर जिल्ह्यातील आयकर अधिकरी दुष्यंत सिंह यांना आश्चर्य वाटलं.दुष्यंत सिंह यांनी आपल्या कॅमेऱ्यात तात्काळ हे फोटो काढले आहे. दुष्यंत यांनी आपल्या वसंत विहार कॉलनीतून हे फोटो क्लिक केले. हिमालयातील गंगोत्री, यमुनोत्री आणि शिवलिक पर्वतरांगा प्रदूषणात घट झाल्याने स्पष्ट दिसू लागल्या आहेत. हे फोटो दुष्यंत सिंह यांनी २० मे रोजी काढले आहेत. आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Want to know which Himalayan peaks are visible from Saharanpur in this picture. Here is the key prepared by Dr Vivek Banerjee who captured this beautiful sight yesterday. Dr Banerjee is a medical professional and love nature photography. https://t.co/5u1S6fn55i pic.twitter.com/6kEVjsDV9S
— Ramesh Pandey (@rameshpandeyifs) May 21, 2021
“मागच्या लॉकडाउनमध्येही हिमालयातील पर्वतरांगा दिसत होत्या. मात्र यावेळी गंगोत्री, यमुनोत्री आणि शिवलिक पर्वतरांगा स्पष्ट दिसत आहेत”, असं दुष्यंत सिंह यांनी सांगितलं.
Coronavirus: मृतांच्या नातेवाईकांकडे अंत्यसंस्कारासाठी केली जातेय ७० हजारांची मागणी
हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. नेटकरीही हे फोटो पाहून आश्चर्यचकीत होत आहेत. किती प्रदूषण असतं याबाबतही कमेंट्समध्ये चर्चा रंगल्या आहेत.