Himani Narwal : काँग्रेसची महिला कार्यकर्ती हिमानी नरवालची यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह रविवारी रोहतक या ठिकाणी सूटकेसमध्ये आढळून आला होता. सचिन नावाच्या एका आरोपीला या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. एवढंच नाही तर सचिन हिमानी यांचा मृतदेह बॅगेत भरुन घेऊन जात असल्याचंही सीसटीव्हीमध्ये दिसतं आहे.

सचिनने काय केलं?

सचिनने मोबाइल चार्जरने गळा आवळून हिमानी यांची हत्या केली. त्यानंतर हिमानी यांचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरला आणि ती सूटकेस रोहतकच्या सांपला बस स्थानकापाशी सोडून दिली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. सचिन सूटकेस ओढत नेताना दिसतो आहे. या सूटकेसमध्ये हिमानी यांचा मृतदेह होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ३२ वर्षांच्या सचिनने गळा मोबाइल चार्जरच्या वायरने हिमानी यांचा गळा आवळला आणि त्यांची हत्या केली. गुरुवारी ही घटना घडली. २२ वर्षीय हिमानीची हत्या केल्यानंतर सचिनने तिचा मृतदेह बॅगेत भरला आणि रोहतक मधल्या सांपला या ठिकाणी ती बॅग सोडून दिली. या घटनेबाबत २ मार्चला माहिती समोर आली आहे.

सचिन आणि हिमानी यांची फेसबुकवर झाली होती ओळख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि हिमानी यांची फेसबुकवर ओळख झाली होती. सचिन हिमानीला भेटण्यासाठी अधूनमधून तिच्या घरी येत होता. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता सचिन हिमानीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. रात्री तो तिच्याच घरी थांबला. दुसऱ्या दिवशी (२८ फेब्रुवारी) दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, सचिनने हिमानीला तिच्याच ओढणीने बांधले आणि त्यानंतर मोबाइल चार्जरने गळा दाबून तिचा खून केला. दोघांच्या झटापटीत सचिनच्या हातालाही दुखापत झाली. त्याच्या रक्ताचे डाग हिमानीच्या घरात आढळून आले आहेत.

सचिनकडून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचं पोलिसांनी केलं स्पष्ट

हिमानीची हत्या केल्यानंतर सचिनने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या चादरीवर सचिनचे रक्त सांडले होते. त्या चादरीतच हिमानीचा मृतदेह गुंडाळून सुटकेसमध्ये भरण्यात आला. त्याने हिमानीची अंगठी, सोन्याची चैन, मोबाइल, लॅपटॉप, इतर दागिने एका बॅगेत भरले आणि तिची दुचाकी घेऊन तो स्वतःच्या गावी बहादुरगड येथे निघून गेला. रात्री १० वाजता तो पुन्हा हिमानीच्या घरी परतला. तिची दुचाकी घराबाहेर उभी केली आणि एक रिक्षा भाड्याने घेऊन त्यात मृतदेहाची बॅग टाकली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रोहतकच्या सांपला येथे निर्जन स्थळी बॅग फेकून दिली होती. आता या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

Story img Loader