आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी लव्ह जिहाद, दंगल यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. हिंदू धर्मीय कधीही दंगलीत सामील होत नाहीत. हिंदू शांतताप्रिय आहेत, असे सोरेन म्हणाले आहेत. ते एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलत होते. विशेष म्हणजेय यावेळी त्यांनी श्रद्धा वालवकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला, गुजरात दंगल यावरही भाष्य केले.
लव्ह जिहादवर बोलताना शर्मा म्हणाले की, “लव्ह जिहादकडे दुर्लक्ष करणे म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण केल्यासारखे मला वाटते. हा महिलांच्या सुरक्षेचा विषय आहे. लव्ह जिहादची अनेक प्रकरणं आहे. त्याबाबतचे अनेक पुरावेदेखील उपलब्ध आहेत. नुकत्याच झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाना त्याचेच उदाहरण म्हणता येईल. माझ्या कृत्यामुळे मला जन्नतमध्ये स्थान मिळेल, असे मत पूनावालाचे आहे. पॉलिग्राफ टेस्टमधून हे समोर आले आहे,” असे शर्मा म्हणाले.
हेही वाचा >> Fifa World Cup 2022 : जपानचा स्पेनवर विजय, जर्मनी थेट स्पर्धेबाहेर
गुजरातमध्ये प्रचार करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी ‘गुजरातमध्ये २००२ साली दंगल झाली. यातील दंगोलखोरांना भाजपाने धडा शिकवला आहे. त्यामुळे आजपर्यंत त्यांनी डोके वर काढण्याचे धाडस केलं नाही,’ असे विधान केले होते. या विधानावरही शर्मा यांनी भाष्य केले. “२०२२ साली दंगल झाल्यानंतर गुजरात सरकारने कठोर कारवाई केली. याच कारणामुळे सध्या येथे शांतता आहे. दंगली घडवणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईमुळेगुजरात सध्या शांत आहे,” असे शर्मा म्हणाले.
हेही वाचा >> द काश्मीर फाइल्स’ला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ म्हणणाऱ्या लॅपिड यांनी मागितली माफी; म्हणाले, “काश्मिरी पंडितांचा…”
“हिंदू शांतताप्रिय आहेत. ते दंगलीमध्ये स्वत:ला गुंतवून घेत नाहीत. हिंदूंचा जिहादवर विश्वास नाही. भविष्यातही हिंदू समुदाय दंगलीमध्ये सामील होणार नाही,” असेही शर्मा म्हणाले.