गौतम अदाणी यांचा एक सामान्य व्यावसायिक ते जगातले तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास हा अतिशय रंजक आहे. व्यावसायिक कौशल्यं असल्याशिवाय इतका मोठा पल्ला गाठणं हे केवळ अशक्य आहे. प्रसिद्ध स्तंभलेखक स्वामीनाथन एस अंकलेसरिया अय्यर यांनी एक कॉलम लिहिला आहे. या कॉलममध्ये त्यांनी म्हटलं आहे गौतम अदाणींवर आरोप लावण्यात येत आहेत की त्यांना भाजपाने अनेक मालमत्ता दिल्या. त्यामध्ये बंदरं, खाणी यांचा समावेश आहे. तसंच एअरपोर्ट, ट्रान्समिशन लाइन्स यांचाही समावेश आहे इकॉनॉमिक टाइम्समध्ये स्वामीनाथन यांनी हा लेख लिहिला आहे.

नेमकं काय म्हटलंय स्वामीनाथन यांनी?

हिंडेनबर्गने जो शोध अहवाल समोर आणला आहे त्यामुळे अदाणी ग्रुपच्या कंपन्यांनी किंमतींमध्ये फेरफेरा आणि घोटाळा केल्याचा आरोप आहे. हा आरोप खूप गंभीर आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर अदाणी ग्रुपमध्ये अनेकांनी जी गुंतवणूक केली होती त्या गुंतवणूकदारांनी घाईघाईने आपल्याकडे असलेले शेअर्स विकले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. मात्र या सगळ्या घडामोडी होत असताना मी एका वेगळा दृष्टीकोन मांडतो आहे असं स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Image of Dr. Manmohan Singh
World On Manmohan Singh Death : “आर्थिक सुधारणांचे शिल्पकार ते अनुत्सुक पंतप्रधान”, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जागतिक माध्यमांची प्रतिक्रिया
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!

अदाणींवर जे टीका करत आहेत त्यांचं हे म्हणणं आहे की अदाणी यांनी त्यांची व्यावसायिक कौशल्य वापरून नाही तर राजकीय ओळख वापरून आपला फायदा करून घेतला आणि इथवर आले. या गोष्टीशी मी असहमत आहे. अनेक व्यावसायिक हे अवघ्या दोन दशकात अगदी किरकोळ पार्श्वभूमी असताना अदाणी झाले. अदाणी यांच्याबाबत जगातला तिसऱ्या क्रमाकांचा व्यक्ती होणं हे फक्त राजकीय नेत्यांच्या संपर्कामुळे आणि ओळखीचा फायदा करून घेतल्याने शक्य नाही. त्यामागे निश्चितच अदाणी यांचीही मेहनत आहे. फक्त राजकीय लोकांमुळे ही बाब घडणं हे जवळपास अशक्य आहे.

पुढे स्वामिनाथन म्हणतात, मी २००६ च्या गुजरातमधल्या बंदर विकासाच्या रणीनितीबाबत अभ्यास केला आहे. केटो इंस्टिट्यूटसाठी यासंबंधीचा अहवालही लिहिला आहे. ही रणनिती ९० च्या दशकात सुरूवातील्या वर्षांमध्ये काँग्रेसचे तेव्हाचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांनी सुरू केली होती. भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी हे धोरण आणखी पुढे नेल. मी गौतम अदाणींनी निर्मिलेल्या मुंदरा या बंदरावर गेलो होतो. तिथे असलेलं उच्च स्तरीय ऑटोमेशन आणि कामाची गती पाहून मी चकित झालो. मला हे ऐकूनही आश्चर्य वाटलं की या ठिकाणी ज्या जहाजांना वेळेत प्रवेश मिळत नाही किंवा वेळेत अनलोडिंग करता येत नाही त्यांना आर्थिक निधी भरपाई म्हणून दिला जातो. १९९० मध्ये मी मुंबईत काम करत होतो. त्यावेळी मी जहाजं २०-२० दिवस बंदरात येण्यासाठी वाट पाहतात हे मी पाहिलं आणि अनुभवलं होतं. मुंदरा पाहिलं तेव्हा मला वाटलं की मी दुसऱ्या ग्रहावर तर नाही ना? असंही स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे.

स्वामिनाथन अकलेसरिया आपल्या लेखात पुढे म्हणतात अदाणींनी लिलावाच्या बाबतीत माएर्स्क आणि दुबई वर्ल्ड सारख्या दिग्गज कंपन्यांना पिछाडीवर टाकत एक डझन इतर बंदरांचंही अधिग्रहण केलं.

हिंडेनबर्गचा अहवाल समोर आला आहे तरीही तो अदाणी यांच्यासाठी वरदान ठरू शकतो. हिंडेनबर्गचा अहवाल हा अदाणींसाठी महत्त्वाचा आहे. कारण त्यांच्या विस्ताराच्या गतीला हा अहवाल काही प्रमाणात कमी करतो आहे. या अहवालामुळे अदाणींकडे पैसे गुंतवणारे भांडवलदार हे भविष्यात आणखी सतर्क होतील. त्यांनी जर अदाणींवर आर्थिक शिस्तीचे नियम लादले तर त्यामुळे अदाणींचा फायदाच होणार आहे. त्यामुळे एका अर्थाने हिंडेनबर्गचा अहवाल हा अदाणींसाठी वरदान ठरू शकतो. मला आज ठाऊक नाही पण असंही घडू शकतं की एक दिवस मी अदाणींचे शेअर्स घेऊ शकेन असंही स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे.

Story img Loader