हिंदी ही अत्यंत सुंदर भाषा आहे, मात्र तिला प्रादेशिक भाषा म्हणून गणले पाहिजे, ती भाषा इतरांवर लादली जाऊ नये, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपटनिर्माते अदूर गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले आहे.

हिंदी अत्यंत सुंदर भाषा आहे, हिंदी भाषा लिहिणारे लेखकही उत्तम आहेत त्याबद्दल शंका असण्याचे कारण नाही, मात्र तुम्ही ही भाषा कोणावरही लादू शकत नाही, असे मत गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले. गेट वे साहित्य महोत्सवाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

एखादी भाषा राष्ट्रीय असल्यास संपूर्ण देशाने ती बोलली पाहिजे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि अन्य भाषा प्रादेशिक आहेत असा विचार करणे चूक आहे. सर्व भाषा प्रादेशिक आहेत, एखादी भाषा संपूर्ण देश बोलत असेल तर ती राष्ट्रीय भाषा होते, पण तसे घडत नाही.

भारतातील अनेक प्रांतात हिंदी भाषा बोलली जात नाही त्यामुळे ही भाषा प्रादेशिक गणली पाहिजे, असेही गोपालकृष्णन म्हणाले.ईशान्येकडील आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जात नाही, त्यामुळे तुम्ही हिंदी राष्ट्रभाषा आहे असे म्हणू शकत नाही, असेही ते म्हणाले.

Story img Loader