प्रख्यात हिंदी लेखक व ‘नयी कहानी’ चळवळीचे अध्वर्यू राजेंद्र यादव यांचे आज निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. यादव यांच्या पश्चात पत्नी व कन्या रचना असा परिवार आहे. यादव यांचा जन्म २८ ऑगस्ट १९२९ रोजी झाला व त्यांनी ‘हंस’ या साहित्यविषयक मासिकाचे संपादन केले. हे मासिक मुन्शी प्रेमचंद यांनी १९३० मध्ये सुरू केले होते. त्या मासिकाचे संपादन १९५३ मध्ये थांबले होते. पण नंतर यादव यांनी ३१ जुलै १९८६ मध्ये ते परत सुरू केले.
हिंदीतील ‘नयी कहानी’ चळवळीचे ते अध्वर्यू होते व मोहन प्रकाश त्यात त्यांच्यासमवेत होते. यादव यांची ‘प्रेत बोलते हैं’ ही पहिली कादंबरी १९५१ मध्ये प्रकाशित झाली व नंतर तिचे नामकरण ‘सारा आकाश’ असे करण्यात आले. त्यावर त्याच नावाचा चित्रपट बासू चटर्जी यांनी काढला होता.  तुरगेनेव, अ हीरो ऑफ अवर टाइम्स व अल्बर्ट कामू यांच्या द आउटसाइडर अशा अनेक कलाकृतींचे त्यांनी हिंदी भावानुवाद केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindi writer rajendra yadav passes away
Show comments