राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते सुरेश भैय्याजी जोशी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हिंदुत्ववादी वक्तव्यावर टीकास्त्र सोडले आहे. हिंदू आणि हिंदुत्व वेगळे नाही असे सुरेश भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे. नाव न घेता संघाचे सुरेश जोशी यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातील फरकाबद्दल बोलल्याबद्दल काँग्रेस खासदारावर टीका केली आहे.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना राहुल गांधींनी, हिंदुत्ववादी गंगेत एकटाच स्नान करतो. हिंदू करोडो लोकांसह गंगेत स्नान करतात. एक बाजू हिंदू, तर दुसरी बाजू हिंदुत्ववादी. एक बाजू खरी, दुसरी बाजू खोटी. हिंदू खरे बोलतात, हिंदुत्ववादी खोटे बोलतात, असे वक्तव्य केले होते. पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवड्यात काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करताना गंगेत स्नान केले होते. राहुल गांधी यांनी यापूर्वी जयपूरमधील ‘महागाई हटाओ रॅली’मध्ये हिंदू विरुद्ध हिंदुत्व या मुद्द्यावरून भाजपा सरकारला घेरले होते.

shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!

त्यावरुन आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुरेश भैय्याजी जोशी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका कार्यक्रमादरम्यान ते बोलता होते. “ज्यांना हे विधान योग्य वाटते त्यांना ते नाकारण्याचे कोणतेही कारण सापडणार नाही. ‘हिंदू’ आणि ‘हिंदुत्व’ या दोन वेगळ्या कल्पना नाहीत. ते समान आहेत. या विषयावर विनाकारण वाद निर्माण करणे म्हणजे गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,” असे सुरेश भैय्याजी जोशी यांनी म्हटले.

“मग आता काय…”; देशात हिंदूंचं राज्य परत आणायचंय या राहुल गांधींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राजस्थानमध्ये काँग्रेसच्या महागाईविरोधातील रॅलीत राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले की, जनता देश चालवत नाही. तीन-चार भांडवलदार चालवत आहेत आणि पंतप्रधान त्यांचे काम करत आहेत. देशाच्या राजकारणात दोन शब्दांची टक्कर आहे. एक शब्द हिंदू आणि दुसरा शब्द हिंदुत्व. देशातील महागाईचे कारण हिंदुत्व असल्याचे राहुल गांधी म्हणाले. यासोबतच राहुल गांधींनी महागाईवरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, अजय माकन, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज काँग्रेसजन उपस्थित होते.

Story img Loader