मध्यप्रदेशातील इंदोर येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जेवणासाठी मुस्लीम तरुणीबरोबर गेलेल्या हिंदू तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. तरुणाला वाचवण्यासाठी आलेल्यांनाही चाकूने भोकसलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
शुक्रवारी ( २६ मे ) इंदोर येथील एक हिंदू तरुण आपल्या मुस्लीम मैत्रिणीसह जेवणासाठी गेला होता. पण, जेवण करून बाहेर आल्यानंतर जमावाने दोघांना घेरलं. यानंतर जमावाने तरुणीला जाब विचारत तरुणाला मारहाण केली आहे. तरुणाला वाचवण्यासाठी मध्यस्थी आलेल्या दोघांनाही जमावाने भोकसल्याचं सांगितलं आहे.
या व्हिडीओत एक व्यक्ती तरुणीला खडसावत आहे. “तू हिजाब घातला आहे. तरीही तू इस्लामचं पालन करत नाही. इस्लामचा अपमान करू नको,” असं तो व्यक्ती तरुणीला म्हणत आहे.
हेही वाचा : “ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे”, रामदेव बाबा महिला कुस्तीपटूंच्या बाजूने मैदानात; केली ‘ही’ मागणी!
याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश रघुवंशी यांनी सांगितलं की, “तरुणी तिच्या पालकांना सांगून तरुणाबरोबर जेवायला आली होती. जमावाच्या गैरवर्तणुकीरवरही तरुणीने आक्षेप घेतला. तसेच, मध्यस्थी पडलेल्या दोन व्यक्तींवरही चाकूने वार करण्यात आला.”