सध्या संपूर्ण देशभरात श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे खळबळ माजलेली असताना शेजारील देश बांगलादेशमध्येही अशीच घटना घडली आहे. अबु बकर याने आपली हिंदू प्रेयसी कविता राणी हिचा खून करुन मृतदेहाचे तुकडे केले आहेत. पोलिसांना घऱात एका बॉक्समध्ये मृतदेहाचं मुंडकं आणि शरीर सापडलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

६ नोव्हेंबरला अबू बकर कामावर आला नव्हता. त्याचा फोन ही लागत नसल्याने कंपनीच्या मालकाने एका कर्मचाऱ्याला त्याच्या भाड्याच्या घरी पाठवलं. पण घराला आतून कडी लावण्यात आली होती. अबू बकर बरेच दिवस घरी न आल्याने घरमालकाला संशय आला आणि त्याने पोलिसांना माहिती दिली.

pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत
baba siddiquie murder plan
Baba Siddhique Murder case: ‘असा’ रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; हल्लेखोरानं कबुलीजबाबात सांगितला संपूर्ण घटनाक्रम!
Mumbai, Youth murder , Dharavi, murder,
मुंबई : धारावीत तरुणाची हत्या; तिघांना अटक
Ajit Rajgond sentenced to six days in forest custody may have hunted ten tigers in 11 years
बहेलियांकडून दहा वाघांची शिकार ! ७० लाखांचा व्यवहार !

Delhi Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाला वेगळं वळण? आफताबचा मोठा खुलासा, म्हणाला “हत्येच्या दिवशी मी…”

पोलिसांना घऱात जाऊन पाहिलं असता एका बॉक्समध्ये मुंडकं नसलेला महिलेचा मृतदेह आढळला. एका पिशवीत मुंडकं ठेवण्यात आलं होतं. मृतदेहाचे हात तिथे नव्हते. मृतदेहाची ओळख पटली असून कविता राणी असं पीडित तरुणीचं नाव आहे.

७ नोव्हेंबरला पोलिसांनी अबु बकरला त्याची लिव्ह-इन पार्टनर सपनासहित अटक केली. बांगलादेशच्या रॅपिड अॅक्शन फोर्सच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अबू आणि सपना गेल्या चार वर्षांपासून एकत्र राहत होते. पाच दिवसांपूर्वीच त्याची कविताशी भेट झाली होती. यानंतर दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. यादरम्यान त्याने तिची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले.

Shraddha Murder Case: तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण…; मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचा पोलिसांकडे धक्कादायक खुलासा

५ नोव्हेंबरला सपना घरात नसताना अबूने कविताला आपल्या भाड्याच्या घरात बोलावलं होतं. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. याच वादात अबूने कविताची गळा दाबून हत्या केली. यानंतर त्याने तिचं मुंडकं आणि हात कापले. कापलेले हात त्याने नाल्यात फेकून दिले. मुंडकं एका पिवशीत गुंडाळून ठेवलं आणि मृतदेह एका बॉक्समध्ये भरुन पळून गेला.

Shraddha Murder Case: किचनमध्ये रक्ताचे डाग, नाल्यात हाडं; आफताबच्या फ्लॅटमध्ये फॉरेन्सिक टीमला काय सापडलं?

त्याच रात्री अबूने सपनासह रुपसा नदी ओलांडली आणि ढाकाच्या दिशेने गेला. दुसरीकडे त्याच्या घऱात कविताचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी लगेच सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलिसांनी दोघांचं ठिकाण शोधलं. यानंतर दोघांनाही अटक करत स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आलं.

चौकशीदरम्यान अबू बकरने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांना मृतदेहाचे हातही सापडले आहेत. एका पिशवीत गुंडाळून ते टाकून देण्यात आले होते.

Story img Loader