पीटीआय, ढाका
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले बांगलादेशमधील हिंदू नेते चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना बांगलादेशमधील न्यायालयाने जामीन नाकारून त्यांची रवानगी तुरुंगात केली. त्यांच्या अटकेविरोधात चितगाव आणि ढाका येथे आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, भारताकडून घटनेवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून, हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी बांगलादेशने द्यावी, असे म्हटले आहे.
बांगलादेश पोलिसांनी सोमवारी चिन्मॉय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना ढाक्यामधील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून अटक करण्यात आली. ते चितगावकडे जात होते. ते ‘सम्मिलीता सनातनी जोत’ या हिंदू संघटनेचे नेते आहेत. दास आणि १८ जणांविरोधात ३० ऑक्टोबर रोजी खटला दाखल करण्यात आला आहे.
बांगलादेशचे माजी पंतप्रधान खालेदा झिया यांच्या ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी’च्या नेत्याने त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. २५ ऑक्टोबर रोजी हिंदू समुदायाच्या रॅलीदरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
खटल्यावर सुनावणीदरम्यान चितगावचे महादंडाधिकारी काझी शारिफुल इस्लाम यांनी त्यांना जामीन नाकारला. चितगावबाहेर त्यांना अटक करण्यात आली. कायद्यानुसार, २४ तास त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले.शेख हसीना सरकार कोसळल्यापासून ५० जिल्ह्यांत हिंदू अल्पसंख्याकांवर दोनशेहून अधिक हल्ले झाले आहेत.
‘अल्पसंख्याकांवर हल्ले करणारे मोकाट’
भारताने या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे आणि बांगलादेश सरकारला हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी देण्यास सांगितले आहे. दास यांच्या अटकेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे, की या घटनेनंतर हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर बांगलादेशमधील अतिरेकी घटकांकडून हल्ले करण्यात आले आहेत. अल्पसंख्याकांची घरे आणि व्यावसायिक आस्थापनांची जाळपोळ आणि लूटमारीच्या अनेक घटना नोंदविल्या गेल्या आहेत. तसेच, बांगलादेशमधील मंदिरांत चोरी आणि देवतांच्या विटंबनाच्या घटनाही घडल्या आहेत. दुर्दैवाने, या घटनांतील दोषी मोकाट आहेत आणि वैधानिक मार्गाने शांततापूर्ण मागणी करणाऱ्या धार्मिक नेत्याविरुद्ध आरोप केले जात आहेत.