उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरातील महानगरपालिका निवडणुकीत हिंदू महासभेने उडी घेतली आहे. या निवडणुकीत हिंदू महासभेने मेरठ महापालिकेवर आमची सत्ता आल्यास सर्वप्रथम मेरठ या शहराचे नाव बदलून ‘नथुराम गोडसे नगर’ असे करू, असे आश्वासन दिले आहे. तसेच आम्ही शहरातील विविध ठिकाणांची इस्लामिक नावे बदलून त्यांना हिंदू महापुरूषांची नावे देऊ, असेही हिंदू महासभेने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Gujarat Election 2022: निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरांना भाजपाचा दणका, आणखी १२ जणांवर निलंबनाची कारवाई

हिंदू महासभा मेरठ महानरपालिकेची निवडणूक लढवणार आहे. येथे हिंदू महासभेतर्फे सर्व जागांवर उमेदवार उभे केले जाणार असून त्यांनी येथील जनतेला मेरठ शहराचे नाव बदलण्याचे आश्वासन दिले आहे. मेरठचे नाव आम्ही नथूराम गोडसे नगर करू, देशाला हिंदूराष्ट्र बनवण्याला आमचे प्राधान्य असेल. त्यानंतर गोमातांच्या संरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करू, शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांची इस्लामिक नावे बदलून त्यांना हिंदू महापुरुषांची नावे दिली जातील, अशी अनेक आश्वासनं हिंदू महासभेने दिली आहेत.

हेही वाचा >>>‘मला जेलमध्ये योग्य अन्न मिळत नाही’, सत्येंद्र जैन यांची कोर्टात याचिका, भाजपाने व्हिडीओ शेअर करत केला भांडाफोड, सीसीटीव्ही व्हायरल

याबाबत हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे. “हिंदू महासभेचे पुरेसे नगरसेवक निवडून आले आणि आमचा महापौर झाला तर आम्ही मेरठ शहराचे नाव नथुराम गोडसे नगर असे करू. तसेच मेरठ शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांना हिंदू महापुरुषांची नावे दिली जातील,” असे शर्मा यांनी सांगितले. ही निवडणूक जिंकण्यासाठी हिंदू महासभेकडून देशभक्त उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. धर्मांतर रोखण्यासही आम्ही प्राधान्य देऊ, असे हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>>पालघर जिल्ह्यासह अरुणाचल प्रदेश, टर्कीमध्ये भूकंपाचे धक्के!

हिंदू महासभेने भाजपा आणि शिवसेनेवरदेखील टीका केली आहे. भाजपाला हिंदुत्ववादी पक्ष म्हटले जाते. मात्र या पक्षात आता अन्य समाजाच्या लोकांचे वचर्स्व वाढत आहे. अगदी अशाच पद्धतीने शिवसेना हा पक्षदेखील मुस्लिमांचे तुष्टीकरण करत आहे, असे हिंदू महासभेच्या मेरठ जिल्हाध्यक्षांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu mahasabha promises rename of meerut city to nathuram godse nagar is elected in municipal election prd