हिंदू विवाह कायद्याअंतर्गत होणाऱ्या विवाहांमध्ये सप्तपदी आणि इतर विधी महत्त्वाचे आहेत. या विधींशिवाय लग्न वैध ठरत नसल्याचं मत अलाहाबाद कोर्टाने नोंदवलं आहे. पत्नीने घटस्फोट न घेता दुसरं लग्न केल्याने तिला शिक्षा सुनवण्यासंदर्भात अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु, न्यायालायने हे प्रकरणच निकाली काढले आहे.

“जोपर्यंत लग्न योग्य विधींनी पूर्ण होत नाही तोवर त्याला लग्नसोहळा म्हणता येणार नाही. पारंपरिक विधींशिवाय विवाह झाला असेल तर तो कायद्याच्या दृष्टीने विवाह ठरत नाही. हिंदू कायद्यांतर्गत सप्तपदी विधी विवाहासाठी आवश्यक विधी आहे”, असं मत न्यायाधीश संजय कुमार सिंह यांनी नोंदवलं. “हिंदू विवाह कायदा १९७७ च्या कलम ७ नुसार, हिंदू विवाह हा पारंपरिक संस्कार आणि समारंभातून केला जातो. या समारंभात सप्तपदी झाल्यानंतर विवाहसोहळा पूर्ण होतो”, असंही न्यायालयाने नोंदवलं.

court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा
CCI probe finds Zomato, Swiggy violating competition norms
स्पर्धा आयोगाकडून चौकशीवर अंतिम निवाडा आला नसल्याचा दावा
Vijay Wadettiwar, Bramhapuri Vijay Wadettiwar,
विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध? उच्च न्यायालय म्हणाले…
bombay high ourt remark on delay in building repairing
इमारत दुरुस्तीतील विलंब हा छळच ! उच्च न्यायालयाची टिप्पणी
Children, illegal marriage, birth registration,
अवैध विवाहातून जन्मलेल्या अपत्यांनाही जन्मनोंदणीचा हक्क

न्यायालयासमोरील निवेदनांमध्ये पत्नीने विधिवत लग्न केल्याचा आरोप असल्याने विवाहातील सप्तपदी संदर्भात कोणतेही तपशील देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पत्नीविरोधात कोणताही गुन्हा दाखल करता येणार नाही, असा निर्वाळा न्यायालायने दिला.

नेमकं प्रकरण काय?

स्मृती सिंग यांचा विवाह २०१७ मध्ये सत्यम सिंग यांच्याशी झाला होता. परंतु, दोघांमध्ये वाद-विवाद वाढल्याने स्मृती सिंग यांनी हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप ठेवत सासरचे घर सोडले. तसंच, पोलिसांत तक्रारही दाखल केली. तपासानंतर पोलिसांनी पती आणि सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, हे प्रकरण मिर्झापूरच्या कौटुंबिक न्यायालयात गेलं. कौटुंबिक न्यायालयाने पत्नीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पतीवर सोपवली. पत्नी दुसरं लग्न करत नाही तोवर सत्यम सिंग यांनी दरमहा चार हजार देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. परंतु, पत्नी स्मृती सिंग हिने दुसरा विवाह केल्याचा आरोप सत्यम सिंग यांनी केला. यासंदर्भात त्यांनी अलाहाबाद न्यायालयात अर्ज दाखल केला. स्मृती सिंगने घटस्फोट न घेता दुसरे विधिवत लग्न केल्याचा आरोप सत्यम सिंगने केला. त्यामुळे २१ एप्रिल २०२२ रोजी स्मृती सिंगला न्यायदंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावले. स्मृती सिंग यांनी आपली बाजू मांडत न्यायालयाने सप्तपदीबाबत मत नोंदवलं आहे.