हिंदू समाजातील पुरूषांमध्ये नपुंसकत्व वाढल्यामुळेच हिंदू समाजाची देशातील लोकसंख्या घटली आहे, असे खळबळजनक विधान करून हिंदू विश्व परिषदेचे (विहिंप) नेते प्रवीण तोगडिया यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते शुक्रवारी भरूच जिल्ह्यातील जंबुसार येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी तोगडिया यांनी नव्या दमाच्या तरूणांनी विहिंपमध्ये सामील होण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. हिंदू पुरूषांमध्ये नपुंसकत्व वाढीस लागल्यामुळे हिंदूंचे देशाच्या लोकसंख्येतील प्रमाण घटले आहे. तेव्हा घरी जाऊन स्वत:च्या पुरूषत्त्वाची उपासना करा. हिंदू जोडप्यांनी मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येला प्रत्युत्तर देण्यासाठी जास्तीत जास्त अपत्ये जन्माला घातली पाहिजेत, असे तोगडिया यांनी यावेळी म्हटले. यावेळी त्यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ख्रिश्चनांकडून करण्यात येणाऱ्या हिंदूंच्या धर्मांतरणावरही टीका केली.
‘मोदी सरकार सत्तेत असल्यामुळे राम मंदिरासाठी आंदोलन करण्याची गरज नाही’
तसेच तोगडिया यांनी सरकारच्या विकास धोरणावरही टीका केली. सरकारचे धोरण हिंदूंना संरक्षण देणारे नसल्याचे त्यांनी म्हटले. तुम्ही बुलेट ट्रेन आणि स्मार्ट सिटीज तयार करत आहात. मात्र, हिंदूच उरले नाहीतर या बुलेट्र ट्रेन्सने कोण प्रवास करणार , स्मार्ट सिटीजमध्ये कोण राहणार, असा सवाल तोगडिया यांनी उपस्थित केला. या सभेत ५० तरूणांना धर्माच्या रक्षणाची शपथ देऊन त्रिशुळांचे वाटपही करण्यात आले.
गोहत्या करणाऱयांना मोदी सुद्धा वाचवू शकत नाहीत- प्रवीण तोगडिया
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा