देशात सनातन धर्मावरुन वरुन सुरु झालेला वाद काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. अशात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्मावर बोलणाऱ्यांना आणि त्याकडे बोट दाखवणाऱ्यांना खास आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. आपला देश सकारात्मकतेच्या दिशेने पुढे जातो आहे तर हे काही लोकांना बघवत नाही असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

“सरकारने ज्या योजना आणल्या आहेत, जी कामं केली आहेत त्यावर सनातन शब्दाचा वापर करुन सगळं काही बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र जे विरोध करत आहेत ते विसरले आहेत की रावणाचा अहंकार असो की बाबर आणि औरंगजेबाने केलेला अत्याचार असो तेव्हाही सनातन संपला नाही. अशात असले तुच्छ लोक काय सनातन संपवणार? “

सनातन धर्माला विरोध करणारेच संपले

योगी आदित्यानाथ पुढे म्हणाले, लोक आपला मूर्खपणा सिद्ध करत सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्यांना हे कळत नाही सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तरीही ती थुंकी आपल्याच तोंडावर येऊन पडते. रावण, हिरण्यकश्यपू, कंस यांसारख्या राक्षसांनी ईश्वराच्या सत्तेला आव्हान दिलं होतं त्या सगळ्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आणि देव आजही आहे. सनातन धर्म हे सत्य आहे जे कधीही नष्ट होणार नाही. ही देवाचीच कृपा आहे की सनातन धर्माला जेव्हा उभारी मिळते आहे त्याच काळात राम मंदिर उभं राहतं आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांनी काय म्हटलं होतं?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका वक्तव्यामुळे सनातन धर्म या शब्दावरुन वाद सुरु झाला. सनातन धर्माचा फक्त विरोध करायला नको, हा धर्म संपवला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा नुसता विरोध करायचा नसतो त्या संपवून टाकायच्या असतात असं त्यांनी म्हटलं होतं. आता योगी आदित्यनाथ यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.

Story img Loader