राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक यांनी शुक्रवारी जयपूर येथे बोलत असताना सांगितले, “आपल्या देशात ‘सेवा’ हा मंत्र बऱ्याच काळापासून चालत आला आहे. सेवेचा जेव्हा विषय समोर येतो, तेव्हा प्रबुद्धजन (बुद्धिवान) मिशनरींचा उल्लेख करतात. मिशनरींनी जगभरात अनेक संस्था, शाळा, रुग्णालय सुरु केले, हे सर्वच जाणतात. सेवेचा मुद्दा स्पर्धेचा नसला तरी हिंदू अध्यात्मिक गुरुंनी मिशनरींपेक्षाही चांगली समाजसेवा केली आहे.” जयपूरच्या जामडोली मधील केशव विद्यापीठात राष्ट्रीय सेवा भारतीच्या सेवा संगम परिषदेच्या उदघाटन प्रसंगी मोहन भागवत यांनी सेवेच्या बाबतीतले आपले विचार व्यक्त केले.

आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, हिंदू समुदायतील संत, संन्यासी सेवा कार्यात गुंतलेले आहेत. तामिळनाडूमधील हिंदू संत हिंदू सेवा उत्सवाचे आयोजन करतात. भारतभर जेव्हा आम्ही विविध कार्यक्रमासाठी भ्रमंती करतो तेव्हा आमच्या लक्षात आले की, दक्षिणेतील चारही राज्यांमध्ये जसे की, कर्नाटक, तेलगू, मल्याळण आणि तामिळ भाषिक प्रांतात अध्यात्मिक गुरु, मुनी, संन्यासी यांनी एकत्र येत मिशनरींपेक्षाही चांगले सामाजिक कार्य केलेले आहे. तसेच याबद्दल खुलासा करताना त्यांनी हेही सांगितले की, मी सेवेच्या बाबतीत स्पर्धेची बाब उपस्थित करत नाही. स्पर्धा हे सेवेचे एकक जोखण्याचे माध्यम असू शकत नाही आणि असूही नये. सेवा ही सेवा असते, तो स्पर्धेचा विषय असू शकत नाही.

industrial production
औद्योगिक उत्पादन दर ऑक्टोबरमध्ये मंदावून ३.५ टक्क्यांवर सीमित
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य

हे वाचा >> “जातीव्यवस्था पंडितांनी म्हणजे ब्राह्मणांनी नाही तर…” मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर संघाची सारवासारव

“माणूस आणि प्राण्यांमध्ये वेगळेपण काय आहे. प्राण्यांमध्ये संवेदना आहे. पण त्या संवेदनेवर आधारीत कृती करण्याची कला माणसांकडे आहे, ज्याला आपण करुणा म्हणतो.”, मानवाकडून केल्या जाणाऱ्या सेवेचा अशाप्रकारे त्यांनी अर्थ सांगितला. आपल्या देशातल्या प्रत्येकाने एकत्र येऊन समाज आणि देश घडविला आहे. जर समाजातला एक जरी घटक कमी झाला तरी आपण अपूर्ण असू. जेव्हा आपण एकत्र असतो, तेव्हाच समाज पुर्णत्वाला जातो, याचे उदाहरण पटवून देताना भागवत यांनी मानवी शरीराचे उदाहरण दिले. “जेव्हा आपल्या पायाला दुखापत होते, तेव्हा संपूर्ण शरीर त्या दुखापतीकडे लक्ष केंद्रीत करते. त्याप्रमाणेच सेवा असली पाहीजे. समाजातला कोणताही घटक त्यापासून वंचित राहायला नको. जर आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचे असेल तर प्रत्येक समाजरूपी शरीराचा प्रत्येक भाग सर्वांग परिपूर्ण झाला पाहीजे. सेवा समाजाचे स्वास्थ राखण्यास मदत करते. पण त्यासाठी व्यक्तिचे स्वास्थ जपले गेले पाहीजे. तरच तो समाजाचे स्वास्थ राखण्यासाठी पुढे येऊ शकेल.”, अशी भूमिका भागवत यांनी मांडली.

राष्ट्रीय सेवा भारतीतर्फे तिसऱ्यांदा अशाप्रकारची परिषद भरविण्यात आली होती. तर यावेळी पहिल्यांदाच याचे आयोजन राजस्थानमध्ये करण्यात आले होते. दर पाच वर्षांनी होणारी ही परिषद २०२० मध्ये होणे अपेक्षित होते, मात्र करोना महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. पहिला सेवा संगम २०१० मध्ये बंगळुरुमध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये सामाजिक क्षेत्रातील ९८ प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. दुसरी परिषद २०१५ मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये ३,५०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यावेळच्या परिषदेमध्ये २,७०० लोक सहभागी झालेले आहेत.

हे ही वाचा >> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे NGO समोर मोठे आव्हान; ‘राष्ट्रीय सेवा भारती’कडून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले जाणार

पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांनीदेखील उदघाटनपर प्रसंगी भाषण केले. या परिषदेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड, माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया, अरुण चतुर्वैदी, राज्यसभेचे खासदार घनश्याम तिवारी, लोकसभेचे खासदार रामचरण बोहरा, सुखबीर सिंह जौनपुरीया, आमदार वासुदेव देवनानी आदी नेते उपस्थित होते.

Story img Loader