Canada Hindu Temple Attack News: कॅनडाच्या ब्रॅम्प्टन भागामध्ये एका हिंदू मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले. अमेरिकेतली संसद सदस्यांनीही या घटनेचा निषेध केला. खुद्द कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, विरोधी पक्षनेते व इतर पक्षीय नेत्यांनीदेखील या घटनेचा निषेध केला. पोलिसांनी दोषींवर तातडीने कारवाई करण्याचाही शब्द दिला. पण सोमवारी दुपारी आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं कॅनडात?

कॅनडाच्या ब्रेम्प्टन भागात हिंदू सभा मंदिरात काही हिंदू भाविक प्रार्थना करत असताना त्यांच्यावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. मंदिर परिसरात ही घटना घडल्यानंतर त्यावर हिंदू भाविकांनीही प्रतिकार केला. यात जोरदार हाणामारी झाल्याचं समोर आलं. सिख फॉर जस्टिस या खलिस्तानवाद्यांच्या संघटनेने ‘भारतीय उच्चायुक्त मंदिरात येण्याला आमचा विरोध होता म्हणून आम्ही आंदोलन करत होतो’, अशी भूमिका मांडली. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे या भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. कॅनेडियन पोलिसांनी मध्ये पडत जमावाला पांगवण्यासाठी कारवाई केली.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
joe biden elon musk
Video: “मला ‘गे’ म्हणाले नी आता पार्श्वभागावर ‘चापट’ मारायचीय”, जो बायडेन यांची एलॉन ‘मस्क’री!
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

नव्या व्हिडीओमध्ये धक्कादायक दावा!

मात्र, आता नव्याने व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये धक्कादायक दावा करण्यात आला आहे. एका हिंदू महिलेनं हा दावा केला असून रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलीस (RCMP) अधिकाऱ्यांनीच हिंदू भाविकांना मारण्यास सुरुवात केल्याचा दावा या महिलेकडून केला जात आहे. व्हिडीओमध्ये चित्रीकरण करणारी महिला एका कॅनेडियन पोलीस अधिकाऱ्याकडे बोट दाखवून ‘ज्यानं आम्हाला मारलं तो हाच’, असं म्हणत आरोप केले आहेत. तसेच, बाजूला उभ्या असलेल्या खलिस्तानवाद्यांना कॅनेडियन पोलीस काहीही करत नसून आम्हाला मात्र ते मारत आहेत, असा दावाही या महिलेनं व्हिडीओमध्ये केला आहे.

Canada Hindu Temple Attacked: कॅनडात हिंदू मंदिरावर खलिस्तानींचा हल्ला; पंतप्रधान ट्रुडोंचा निषेध!a

दरम्यान, तिथे उपस्थित जमावाला रोखण्याचा, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना काही कॅनेडियन पोलीस अधिकारी व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ हिंदू सभा मंदिर परिसरातीलच असल्याचं सांगितलं जात असून मंदिराच्या गेटवर काही लोक हातात तिरंगा घेऊनही उभे असल्याचं दिसत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात नेमकं काय घडलं आणि त्यामागे कुणाचा काय हेतू होता? याबाबत आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

पोलिसांनी काय कारवाई केली?

दरम्यान, कॅनेडियन पोलिसांनी रविवारी घडलेल्या प्रकाराबाबत आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर हिंसक कारवाया करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कॅनेडियन पोलिसांची दोन पथकं या घटनेचा तपास करत असल्याची माहिती आरसीएमपीकडून देण्यात आली आहे.