Hindu Temple Attacked in Canada: रविवारी कॅनडातील ब्रॅम्प्टन परिसरातल्या एका हिंदू मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरात आलेल्या काही भाविकांवर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर खलिस्तानवादी व मंदिरातील भाविक असे दोन्ही गट आपापसांत भिडले व तुफान हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली असून त्यात काहीजण जखमी झाल्याचंही वृत्त आहे. भारतीय उच्चाधिकारी मंदिराला भेट देण्यासाठी आल्याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन करत होतो, असा दावा या घटनेत सहभागी खलिस्तानवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ कडून करण्यात आला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, विरोधी पक्षनेते पिएर्रे पोलिव्हरे व एनडीपी नेते जगमीत सिंग यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये टोरंटोतील ब्रॅम्प्टन परिसरात हिंदू सभा मंदिर परिसरात हा हाणामारीचा प्रकार घडल्याचं दिसत आहे. खलिस्तान समर्थक व भारताचा ध्वज हातात घेतलेला जमाव एकमेकांना भिडला. काही व्हायरल व्हिडीओ क्लिप्समध्ये हे दोन्ही गट लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारत असल्याचंही दिसत आहे.

Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Amit Shah, justin trudeau
Amit Shah Canada : “कॅनडातील फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसेमागे अमित शाह”, ट्रुडो सरकारचे गंभीर आरोप
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

या घटनेनंतर कॅनडातील उच्चपदस्थ नेतेमंडळींनी या प्रकाराचा निषेध केला आहे. “कॅनडातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या धार्मिक प्रथांचं मुक्त व सुरक्षित वातावरणात पालन करण्याचा अधिकार आहे”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दिली आहे. विरोधी पक्षनेते पॉलिव्हरे यांनीदेखील धार्मिक समुदायाला अशा प्रकारे लक्ष्य करण्याचा निषेध केला असून हा सगळा गोंधळ संपवण्याचं आश्वासन दिलं.

खलिस्तानींकडून कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांना गटात सामील होण्याची धमकी? नेमके प्रकरण काय?

अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक नाही!

दरम्यान, एकीकडे कॅनडाच्या पंतप्रधानांसह इतर महत्त्वाच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध केला असला, तरी अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक केली नसल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच, या प्रकरणी कुणावर गुन्हाही दाखल केलेला नसल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र, अशा प्रकारचा हिंसाचार झाला असल्यास त्याची सखोल चौकशी केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

“कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येकाला शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवण्याचा अधिकार आहे. पण अशी गुन्हेगारी कृत्ये अस्वीकारार्ह आहेत. जे कुणी यात सहभागी असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया स्थानिक पोलीस प्रमुख निशन दुरईयापा यांनी दिली.

Story img Loader