जयपूर येथे पक्षाच्या अधिवेशनात हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या एका खासगी तक्रार खटल्यात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना साक्षीदार म्हणून पचारण करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका गुरुवारी दिल्लीतील न्यायालयात दाखल करण्यात आली.
माहितीचा अधिकार कार्यकर्ते विवेक गर्ग यांनी सदर याचिका केली आहे. पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांना पाचारण करणे का गरजेचे आहे त्याचे स्पष्टीकरण द्यावे, असे महानगर दंडाधिकारी हारून प्रताप यांनी गर्ग यांना सांगितले आहे.
तक्रारदाराने ज्या व्यक्तींना साक्षीदार म्हणून पाचारण करण्याची विनंती केली आहे त्या प्रत्येकाला पाचारण करणे का गरजेचे आहे, याची कारणे देण्याचे आदेश दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर त्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही सादर करण्यास सांगितले आहे. मणिशंकर अय्यर आणि राजस्थान काँग्रेसचे चंद्रभान यांनाही साक्षीदार म्हणून पाचारण करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.

Story img Loader